advertisement

धनगर आरक्षणासाठी हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Last Updated:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी विधान भवनात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली.

News18
News18
मुंबई : मागील काही वर्षांपासून धनगर आरक्षणाच्या मुद्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. अखेरीस राज्य सरकारकडून आता धनगर आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे.  "धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्या सोबत बैठकीचं तातडीनं आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन धनगर बांधवाच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी विधान भवनात धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये धनगर आरक्षणासंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली.
धनगर आरक्षणाबाबत कायदेशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे महाधिवक्ते यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे  धनगर बांधवांच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
advertisement
तसंच,  "महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे इतिहासात भरीव योगदान आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करून आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे" असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
"महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे ऐतिहासिक योगदान भरीव आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत धनगर समाजातील या विषयाचा अभ्यास असलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन तातडीने करण्यात येईल. त्यातून आरक्षणासाठीची कायदेशीर दिशा स्पष्ट होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देताना सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करुन आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
advertisement
या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसंच, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, विधि न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, पदुम सचिव डॉ रामास्वामी एन. आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
धनगर आरक्षणासाठी हालचालींना वेग, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले महत्त्वाचे आदेश
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement