advertisement

Shivam Dube : फायनलनंतर ट्रेनने घरी आलेल्या दुबेने मुंबईत घेतले 2 फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप फायनलनंतर विमानाची तिकीटं मिळत नसल्यामुळे ऑलराऊंडर शिवम दुबे हा अहमदाबादवरून थ्री टायर एसी ट्रेनने मुंबईमध्ये आला.

फायनलनंतर ट्रेनने घरी आलेल्या दुबेने मुंबईत घेतले 2 फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!
फायनलनंतर ट्रेनने घरी आलेल्या दुबेने मुंबईत घेतले 2 फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू चर्चेत आले आहेत. वर्ल्ड कप फायनलनंतर विमानाची तिकीटं मिळत नसल्यामुळे ऑलराऊंडर शिवम दुबे हा अहमदाबादवरून थ्री टायर एसी ट्रेनने मुंबईमध्ये आला. शिवम दुबेने सेमी फायनल आणि फायनलमध्ये छोट्या पण जलद खेळी करून टीमला विजयापर्यंत पोहोचवलं. वर्ल्ड कप फायनलनंतर ट्रेनने घरी आलेल्या शिवम दुबेने मुंबईमध्ये घर विकत घेतलं आहे.

किती आहे दुबेच्या घराची किंमत?

शिवम दुबेने लागोपाठ दुसऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. डावखुरा आक्रमक बॅटर असलेल्या दुबेने मुंबईमध्ये कोट्यवधींचं घर घेतलं आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार शिवम दुबेने जून 2025 मध्ये मुंबईच्या ओशिवारा भागात 2 फ्लॅट विकत घेतले आहेत. या दोन फ्लॅटची किंमत 27.50 कोटी रुपये आहे. हे दोन्ही फ्लॅट डीएलएच एनक्लेव्हमध्ये आहेत.
advertisement
दुबेने विकत घेतलेले हे दोन्ही फ्लॅट एकाच बिल्डिंगमध्ये आहेत. एक फ्लॅट 17व्या आणि दुसरा 18व्या मजल्यावर आहे. या दोन्ही फ्लॅट 9,600 स्क्वेअर फूटचा आहे. या फ्लॅट विकत घेताना शिवम दुबेने 1.65 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी म्हणून दिले आहेत. याशिवाय त्याने सोसायटीमध्ये 3 पार्किंग स्लॉटही विकत घेतले आहेत.

शिवम दुबेची कमाई

advertisement
एक टी-20 मॅच खेळल्यानंतर दुबेला 3 लाख रुपये मिळतात, तसंच बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये दुबेला ग्रेड सी मध्ये ठेवण्यात आलं आहे, ज्यात त्याला वर्षाला 1 कोटी रुपये दिले जातात. आयपीएलमध्ये दुबे चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये दुबेला 12 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं, यानंतरच दुबेने हा फ्लॅट विकत घेतला.
advertisement

दुबेचा वर्ल्ड कपमध्ये धमाका

टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये दुबेने 25 बॉलमध्ये 43 रन आणि फायनलमध्ये 8 बॉलमध्ये 26 रन करून टीम इंडियाला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. याचसोबत शिवम दुबे लागोपाठ 2 टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा भाग बनला. दुबेने 2019 साली टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मागच्या 3 वर्षांपासून शिवम दुबे टीम इंडियाकडून टी-20 फॉरमॅटमध्येच खेळत आपलं स्थान पक्कं केलं आहे. आयपीएलमध्येही दुबेने स्वत:ची छाप पाडली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shivam Dube : फायनलनंतर ट्रेनने घरी आलेल्या दुबेने मुंबईत घेतले 2 फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement