MMRDA Recruitment 2026: तरूणांनो MMRDA मध्ये चांगल्या पगाराची नोकरी, 'ही' अजिबात घालवू नका संधी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) राज्यातल्या तरूणांसाठी बंपर नोकरभरती केली जाणार आहे. कोणकोणत्या रिक्त पदांसाठी आणि किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, जाणून घेऊया...
advertisement
ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती केली जात असून परीक्षा शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या आस्थापनेवरील गट-अ, गट-ब आणि गट-क अशा वेगवेगळ्या संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन नोकरभरतीच्या माध्यमातून भरण्याकरीता जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 पासून 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
advertisement
advertisement
संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधी माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल. सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (स्थापत्य), सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (रेलपथ), सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (संकेत आणि दूरसंचार) आणि उपनियोजक या पदांचा 'गट- अ'मध्ये समावेश होतोय.
advertisement
'गट- अ' पदांसाठी 56,100 ते 1,77,500 इतका पगार असणार आहे. उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर ठरवण्यात आले आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (स्थापत्य) पदासाठी 7 रिक्त जागा असून सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (रेलपथ), सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (संकेत आणि दूरसंचार) आणि उपनियोजक या पदांसाठी प्रत्येकी 1 रिक्त जागा आहे.
advertisement
सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (स्थापत्य) आणि सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (रेलपथ) पदासाठी सिव्हिल इंजिनियरिंग शिक्षणाची अट संबंधित विभागामध्ये 5 वर्षांच्या अनुभवाची गरज आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी- 1 (संकेत आणि दूरसंचार) पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन पदाची इंजिनियरिंग केलेली असावी.
advertisement
कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता हवी आहे, याची सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये प्राप्त होईल. 18 ते 38 वयोगटासाठी वयोमर्यादा असून वयामध्ये कोणतीही उमेदवारांना अट मिळणार नाही. बातमीमध्ये नोकरभरतीच्या जाहिरातीची आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक देण्यात येत आहे. त्याचा वापर करून अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
advertisement
जर अर्जदाराच्या मनात अर्जाबाबत कोणतीही शंका असेल तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या 9513165586 या मोबाईल क्रमांकावर रविवार आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी वगळता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा. 022-65964000/ 7700/ 7400 या हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. 18 फेब्रुवारी पासून ऑनलाईन अर्जासाठी सुरूवात झाली असून 20 मार्च पर्यंत रात्री 23.59 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहेत.









