advertisement

इराणचा मोठा पलटवार! सौदीतील अमेरिकन एअरबेसवर केला हल्ला, इंधन वाहून नेणारे पाच विमानं उद्ध्वस्त

Last Updated:

US-Israel-Iran War : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष हा वाढतच चालला आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात मोठ्या ताकदीने लढत आहेत. अशातच आता युद्धासंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे.

US-Israel-Iran War
US-Israel-Iran War
US-Israel-Iran War : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष हा वाढतच चालला आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात मोठ्या ताकदीने लढत आहेत. अशातच आता युद्धासंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. प्रिन्स सुलतान या अमेरिकन हवाई तळावर इराणने हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या पाच इंधन वाहून नेणाऱ्या विमानांचे नुकसान झालं आहे.या घटनेनं दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढलाय.
The Wall Street Journal च्या माहितीनुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात विमानांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी ती पूर्णपणे नष्ट झाली नाहीत. सध्या या विमानांची दुरुस्ती सुरू आहे.तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याधीही घडली होती घटना
दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांपूर्वी पश्चिम इराकमध्ये अमेरिकन हवाई दलाचे बोईंग KC-135 Stratotanker हे इंधन भरणारे विमान कोसळले होते.या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता.
advertisement
अमेरिकेकडून खार्ग बेटावर हल्ला
अमेरिकेने इराणच्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणची काही महत्त्वाची लष्करी ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र या हल्ल्यात बेटावरील तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांना नुकसान पोहोचू नये याची काळजी घेण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
advertisement
दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्राइल यांनी मिळून इराणमध्ये संयुक्त हल्ले केले होते. त्यानंतर हा संघर्ष अधिक वाढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल तसेच आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणचा मोठा पलटवार! सौदीतील अमेरिकन एअरबेसवर केला हल्ला, इंधन वाहून नेणारे पाच विमानं उद्ध्वस्त
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement