advertisement

प्रत्येक महिन्याला 2000 रु. गुंतवून करोडपती कसं व्हायचं? SIP चा जादुई फॉर्म्युला

Last Updated:
स्टेप-अप SIP मध्ये दरवर्षी गुंतवणूक वाढवून चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. २,००० रुपयांपासून सुरूवात करून २४-२५ वर्षांत १ कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
1/8
SIP
अमेरिका इराण युद्धाचे पडसाद जगभरात उमटले आहेत. शेअर मार्केट आणि सोन्या चांदीमधील गुंतवणूक आताच्या घडीला सर्वात मोठी रिस्क आहे. कधी वाढेल किंवा कधी कोसळेल याचा भरवसा नाही. मग अशावेळी त्यातल्या त्यात दिलासा देणारं म्युच्युअल फंड आहे. त्यामुळे लोक म्युच्युअल फंडकडे वळताना दिसत आहेत.
advertisement
2/8
SIP calculation
महागाईच्या काळात नुसते पैसे वाचवून भागत नाही, तर ते योग्य ठिकाणी वाढवणे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही दरमहा फक्त २,००० रुपयांची बचत करून ती योग्य पद्धतीने गुंतवली, तर भविष्यात तुम्ही १ कोटी रुपयांहून अधिकचा फंड सहज उभा करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त स्टेप-अप SIP या ट्रिकचा वापर करायचा आहे.
advertisement
3/8
SIP investment news
साध्या एसआयपीमध्ये तुम्ही दरमहा एकच ठराविक रक्कम जमा करता. मात्र, स्टेप-अपमध्ये तुम्ही दरवर्षी तुमची गुंतवणुकीची रक्कम एका ठराविक टक्क्याने उदा. १०% किंवा १५% वाढवता. तुमची पगार जशी दरवर्षी वाढते, तशीच गुंतवणूक वाढवल्यामुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा अनेक पटींनी वाढतो.
advertisement
4/8
SIP news
२,००० रुपयांपासून करोडपती होण्याचं गणित- समजा तुम्ही आज २,००० रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात १०% वाढ केली, तर १५% सरासरी परताव्याच्या आधारावर १० वर्षाच्या हिशोबानं तुमची मासिक SIP ४,७१६ रुपयांपर्यंत पोहोचलेली असेल आणि तुमच्याकडे साधारण ९.३५ लाख रुपयांचा फंड तयार होईल.
advertisement
5/8
sip investment details
२०वर्षांचा विचार केला तर कंपाउंडिंगचा जादूई परिणाम दिसायला लागेल. २० वर्षांनंतर तुमची मासिक गुंतवणूक १२,२३० रुपये असेल, पण तुमचा एकूण फंड ६४ लाख रुपयांच्या पार गेलेला असेल.
advertisement
6/8
प्रतिकात्मक फोटो
२४-२५ वर्षे: हा या गुंतवणुकीचा टर्निंग पॉईंट असेल. २४ व्या वर्षाच्या शेवटी तुमची एकूण रक्कम १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल.बाजारातील चढ-उतार लक्षात घेता, जर तुम्हाला १५% ऐवजी १२% परतावा मिळाला, तर १ कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला २४ ऐवजी २८ वर्षे लागतील. म्हणजेच, तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल.
advertisement
7/8
पैसे
वाढत्या महागाईच्या काळात पैशांचे मूल्य कमी होते, स्टेप-अप SIP ही घसरण रोखण्यास मदत करते. पगार वाढल्यावर दरवेळी नवीन गुंतवणूक शोधण्यापेक्षा, ही सिस्टिम आपोआप तुमची गुंतवणूक वाढवत नेते. साध्या SIP च्या तुलनेत स्टेप-अप पद्धत तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय ५ ते ७ वर्षे आधी पूर्ण करून देते.
advertisement
8/8
पैसे आणि नफा
कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नफ्या तोट्याची जबाबदारी आणि खबरदारी न्यूज 18 मराठी घेत नाही. त्यामुळे कुठेही पैसे गुंतवण्याआधी माहिती घ्या आणि तज्ज्ञांचा सल्लाही घ्या.
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement