PAK vs BAN : LIVE मॅचमध्ये मोठी दुर्घटना! पाकिस्तानी खेळाडूला स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेलं, 7 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PAK vs BAN, Hussain Talat hospitalised : बाउंड्री रोखण्याचा प्रयत्न करत असताना डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे हुसेन तलतला रुग्णालयात नेण्यात आलं.
Pakistan vs Bangladesh, Hussain Talat Injury : दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला 275 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर बांगलादेशचा डाव पहिल्या पाच ओव्हरमध्येच गडबडला. पाकिस्तानच्या बॉलिंगला चांगली सुरूवात मिळाली होती. त्याचवेळी सातवी ओव्हर घेऊन शाहीन शाह आफ्रिदी बॉलिंगला आला. शाहीनने आधीच दोन विकेट नावावर केले होते. त्यामुळे बांगलादेशवर प्रेशर होतं. अशातच कॅप्टन लिटन दास आणि हृदय बॅटिंग करत असताना लिटन दासने स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी घेयर चेंज केले. त्यावेळी फोर आडवताना हुसेन तलत जखमी झाला.
स्टेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आलं
बाउंड्री रोखण्याचा प्रयत्न करत असताना हुसेन तलत याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी तो वेदनेने कळवळला. दुखापत झाल्यानंतर हुसेन तलतला रुग्णालयात नेण्यात आलं. हाताला दुखापत झाली असताना त्याला स्टेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आलं. बॉल अडवण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय जाहिरात बोर्डाच्या फोम पॅडिंगवर पडला आणि तो वेगाने आदळला. डाव्या खांद्यावर जोरात पडल्यामुळे तो वेदनेने विव्हळत होता.
advertisement
Pakistan all-rounder Hussain Talat sustained a shoulder injury while fielding during the second ODI against Bangladesh.
Talat received immediate medical attention then he has been taken to a hospital for a detailed examination. Get well soon Husain pic.twitter.com/SyKZnNNfwj
— Sohail Imran (@sohailimrangeo) March 13, 2026
advertisement
पीसीबीने दिली अधिकृत माहिती
घटनेनंतर लगेचच पाकिस्तानचे खेळाडू आणि मेडिकल स्टाफ त्याच्या मदतीसाठी धावले. त्याची अवस्था पाहून त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी स्ट्रेचर मागवण्यात आले आणि तिथून थेट रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणावर अधिकृत माहिती दिली आहे. पाकिस्तान बोर्डाने सांगितलंय की, मैदानावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
दरम्यान, तलक आगामी मॅच खेळेल की नाही, यावर अद्याप कोणतीही माहिती नाही. वैद्यकीय चाचणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्या विविध टेस्ट केल्या जात आहेत, असंही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Location :
First Published :
Mar 14, 2026 8:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : LIVE मॅचमध्ये मोठी दुर्घटना! पाकिस्तानी खेळाडूला स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेलं, 7 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?










