Food Reheating : चपाती आणि भातासह 'हे' पदार्थ दुसऱ्यांदा गरम करू नये! नाहीतर होईल अपचन आणि अॅसिडिटी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Avoid reheating these food : पदार्थ थंड झालेले असले, तर आपण त्याला पुन्हा गरम करून खातो. मात्र ही सवय काही पदार्थांच्या बाबतीत अतिशय चुकीची ठरू शकते. काही पदार्थ परत गरम केल्यानंतर त्यांचे पोषण तर कमी होतेच शिवाय ते आपल्या शरीरात समस्याही निर्माण करतात.
मुंबई : आपल्या जेवणातले काही पदार्थ आपण शक्यतो गरमच खातो. हे पदार्थ आपल्याला थंड चालतच नाही. अशावेळी जर हे पदार्थ थंड झालेले असले, तर आपण त्याला पुन्हा गरम करून खातो. मात्र ही सवय काही पदार्थांच्या बाबतीत अतिशय चुकीची ठरू शकते. काही पदार्थ आपण परत गरम केल्यानंतर त्यांचे पोषण तर कमी होतेच शिवाय ते आपल्या शरीरात समस्याही निर्माण करतात.
न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून अशा तीन पदार्थांबद्दल माहिती दिली आहे, जे पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यांचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून आपण ते टाळले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्यामते, 'आपल्या फ्रिजमधील प्रत्येक गोष्ट पुन्हा गरम करण्यासाठी सुरक्षित नसते. काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यांचे पोषण कमी होऊ शकते किंवा पचनक्रियेतही अडथळा येऊ शकतो.' चला तर मग पाहूया हे तीन पदार्थ कोणते आहेत.
advertisement
हे तीन पदार्थ पुन्हा गरम करणे टाळा..
चपाती : चपातीही लोकांना गरम गरमच खायला आवडते. ताजी बनवलेली चपाती गरम खाणं चांगलंच असतं. पण जेव्हा आपण ती थंड झाल्यानंतर पुन्हा गरम करतो आणि खातो. तेव्हा समस्या सुरु होतात. पुन्हा गरम केलेली चपाती कोरडी होते आणि पचायला अवघड जाते. यामुळे पोट फुगण्याची शक्यता खूप जास्त असते.
advertisement
भात : भात तर लोकं हमखास गरम करून खातात. बऱ्याचदा थंड झालेला भात तसाच गरम करून खाल्ला जातो किंवा त्यात आणखी साहित्य टाकून फोडणीचा तिखट भात बनवला जातो. हा भात बऱ्याच ज्यांना खूप आवडतो. मात्र हा तुमच्या समस्यांचं कारणंही बनू शकतो. भात योग्य पद्धतीने स्टोअर केला नाही तर त्यात हानिकारक बॅक्टेरिया तयार होऊ शकतात.
advertisement
चहा : चहा आपल्याकडे अनेक लोकांचा वीक पॉईंट असतो. बऱ्याच लोकांना चहाशिवाय जमतच नाही. असे लोक दिवसातून अनेकवेळा चहा घेतात. मात्र त्रास तेव्हा वाढू शकतो जेव्हा काही वेळापूर्वी बनवलेला चहा आपण पुन्हा गरम करून पितो. चहा पुन्हा गरम केल्याने अँटीऑक्सिडंट्स कमी होतात आणि हे अॅसिडिटीचा कारण बनू शकते.
advertisement
न्यूट्रिशनिस्ट श्वेता यांनी हेही सांगितलं की, आयुर्वेदात ताज्या शिजवलेल्या अन्नालाडू जास्त महत्त्व असतं. कारण यामध्ये जास्तीत जास्त जीवन ऊर्जा असते, असं मानतात. अन्न जितकं जास्त वेळ राहातं तितकं ते जड होत जातं आणि पचण्यासाठी त्रास होऊ शकतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 8:41 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food Reheating : चपाती आणि भातासह 'हे' पदार्थ दुसऱ्यांदा गरम करू नये! नाहीतर होईल अपचन आणि अॅसिडिटी








