advertisement

कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन बदला, हे चार दिवस अंबाबाई दर्शन बंद राहणार, कारण काय?

Last Updated:

Ambabai Temple: कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शन चार दिवस बंद राहणार आहे. या काळात भाविकांना प्राणप्रतिष्ठापित मंगल श्रीकलश तसेच उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येईल.

ambabai temple कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन बदला, हे चार दिवस अंबाबाई दर्शन बंद राहणार, कारण काय?
ambabai temple कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन बदला, हे चार दिवस अंबाबाई दर्शन बंद राहणार, कारण काय?
कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अंबाबाई दर्शनासाठी कोल्हापूरला येण्याचा प्लॅन असेल तर तो बदलावा लागणार आहे. आज, 14 मार्चपासून 4 दिवस अंबाबाईच्या मुख्य मंदिरातील दर्शन बंद राहणार आहे. मंदिरात सुरू असलेल्या मंदिर विकास प्रकल्पाअंतर्गत गाभाऱ्याचे जतन व संवर्धन करण्यात येणार असून त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबाबाई मंदिरातील मूळ मूर्तीचे दर्शन शनिवार ते मंगळवार (दि. 14 ते 17 मार्च) या काळात बंद राहील. या काळात भाविकांना प्राणप्रतिष्ठापित मंगल श्रीकलश तसेच उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येईल. मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
पुरातत्व विभागामार्फत श्री महाकाली, श्री महालक्ष्मी श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही मंदिराच्या अंतर्गत व बाह्य भागांच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यामध्ये मंदिराच्या मूळ दगडी बांधकामाचे जतन व संवर्धन केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील हे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू असून सॅण्ड ब्लास्टिंग तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे दगडी भिंतींना पडलेल्या भेगा चिरा भरून निघतात तसेच बांधकाम अधिक भक्कम होईल.
advertisement
दरम्यान, मंगळवारी, 17 मार्च रोजी देवीचे आगमोक्त व वेदोक्त धार्मिक विधी केले जातील. तसेच पूर्णाहुती झाल्यानंतर दुपारी साडेबाराची आरती होईल. त्यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन पूर्ववत सुरू होईल. तरी भक्तांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन बदला, हे चार दिवस अंबाबाई दर्शन बंद राहणार, कारण काय?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement