उन्हाळी सुट्टीत बिनाधास्त फिरा, मध्य रेल्वेच्या 1484 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं जाणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Central Railway: उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. प्रवासासाठी अनेकजण रेल्वेलाच पहिली पसंती देतात.
पुणे: उन्हाळी सुट्टीच्या काळात अनेकजण पर्यटनासह बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून राज्यासह देशभरातील विविध ठिकाणी 1 हजार 484 उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये 749 आरक्षित आणि 735 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या प्रवाशांच्या मागणीनुसार चालवण्यात येत असून यामध्ये काही अतिरिक्त गाड्या देखील सोडण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
राज्यातील शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यावर उन्हाळी सुट्ट्या सुरू होतात. त्यानंतर पर्यटनासाठी राज्यात आणि परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यातील बहुसंख्य प्रवासी हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेलाच पहिली पसंती देतात. त्यामुळे उन्हाळी गाड्यांचे ऑनलाईन बुकिंग सुरू होताच ते अवघ्या काही दिवसांत वेटिंगवर जाते.
advertisement
उत्तर आणि मध्य भारतात जाणाऱ्या गाड्यांसह पर्यटन स्थळ परिसरातून जाणाऱ्या गाड्यांना या काळात मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे या गाड्यांचे वेटिंग काही काळातच 200 ते 400 पर्यंत जाते. प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.
महाराष्ट्रात धावणाऱ्या गाड्या
दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून 1 हजार 484 उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येतील. त्यामध्ये मुंबई / दौंड सोलापूर, पुणे - कोल्हापूर, नाशिक रोड- बडनेरा आणि हडपसर- हरंगुळ दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
महाराष्ट्राबाहेरील गाड्या
महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांसाठी विशेष रेल्वे सेवांमध्ये मुंबई- बलिया, मुंबई- गोरखपूर, दौंड- कलबुर्गी आणि सोलापूर- कलबुर्गी / अनकापल्ली दरम्यानच्या गाड्यांचा समावेश असेल. प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 7:35 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
उन्हाळी सुट्टीत बिनाधास्त फिरा, मध्य रेल्वेच्या 1484 स्पेशल ट्रेन, कुठून कुठं जाणार?







