advertisement

Pune News: पुणेकरांना मंगळवारी पाणी मिळणार नाही? 'आता थेट पुरवठा तोडणार' जलसंपदा विभागानं का दिला 'अल्टिमेटम'?

Last Updated:

खडकवासला प्रकल्पाची तब्बल ९४८ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. येत्या सोमवारपर्यंत पैसे जमा न केल्यास मंगळवारपासून पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

जलसंपदा विभागाचा 'पाणी तोडण्याचा' इशारा (प्रतिकात्मक फोटो)
जलसंपदा विभागाचा 'पाणी तोडण्याचा' इशारा (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे शहरावर भर उन्हाळ्याच्या तोंडावर 'पाणीबाणी'चं संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खडकवासला प्रकल्पाची तब्बल ९४८ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि. २३) पैसे जमा न केल्यास मंगळवारपासून (दि. २४) पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. या थेट इशाऱ्यामुळे पुणे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
वाद नेमका काय?
जलसंपदा विभागाच्या मते, पुण्यासाठी ११.६० टीएमसी पाणीकोटा मंजूर असताना महापालिका दरवर्षी ८ ते ९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरते. या जादा वापरासाठी दंडासह वर्षाला ३०० कोटी रुपये भरणे अपेक्षित आहे, मात्र महापालिकेने चालू वर्षात केवळ ९७ कोटी रुपये भरले आहेत. यामुळे थकबाकीचा डोंगर मोठा झाला आहे.
आयुक्तांचा दावा विरुद्ध विभागाचा आरोप
दुसरीकडे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी असा दावा केला आहे की, महापालिकेचेच ४११ कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त जमा आहेत. मात्र, जलसंपदा विभागाने हा दावा 'तथ्यहीन' असल्याचे म्हटले आहे. "आधी थकबाकी भरा, मग दावे करा," अशा कडक शब्दांत विभागाने पालिकेला सुनावले आहे.
advertisement
प्रदूषित पाण्याचाही दंड
केवळ पाणीपट्टीच नाही, तर १३ टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीत सोडले जात असल्याने महापालिकेवर मोठा दंड आकारला जात आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत पालिकेने आधीच १.२४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरले आहे. जर दोन्ही विभागांतील हा वाद सुटला नाही, तर उन्हाळ्याच्या तोंडावर पुणेकरांना कोरड्या घशाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांना मंगळवारी पाणी मिळणार नाही? 'आता थेट पुरवठा तोडणार' जलसंपदा विभागानं का दिला 'अल्टिमेटम'?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement