advertisement

Navi Mumbai : ''आई, येतो मी"; घरातून बाहेर पडले पण...; ऐरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना

Last Updated:

Navi Mumbai Accident News : नवी मुंंबईतून समोर आलेल्या अपघाताना अक्षरशा तरुणांच्या दोन्ही कुटुंबियांना हादरुन सोडलं आहे. जिथे अपघात इकता भीषण होता की तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे.

नवी मुंबईतील भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू
नवी मुंबईतील भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू
नवी मुंबई : घरातून बाहेर पडलेले मुलं परत कधीच परत येणार नाही,असं कधीच या कुटुंबियांना वाटलं नव्हतं. मात्र ती सकाळ दिंडे आणि सावर्डेकर या कुटुंबियांसाठी अत्यंत दुर्देवी ठरली.
शेवटचा निरोप ठरला कायमचा
ऐरोलीमधून सध्या समोर आलेल्या अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली सेक्टर 14 परिसरात असलेल्या एका शाळेसमोरच हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकरणी सध्या पोलिसांनी जेसीबी चालकाविरोद्धात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरु आहे.
advertisement
नेमका अपघात घडला कसा?
घटनेदिवशी जेसीबी चालक हनुमंत शिंदे (वय29)हा वाहन घेऊन रस्ता ओलांडत होता. त्याच दरम्यान समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला त्याची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की त्या धडकेत मोटारसायकलवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात दिग्विजय दिंडे आणि हर्षद सावर्डेकर अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन मृतदेह पुढील तपासासाठी पाठवले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : ''आई, येतो मी"; घरातून बाहेर पडले पण...; ऐरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement