advertisement

पश्चिम बंगालचा सर्वात Latest ओपिनियन पोल, आकडे पाहून राज्यात खळबळ उडाली; कोणाला किती जागा?

Last Updated:

West Bengal Opinion Poll: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026ची घोषणा होताच राज्यातील राजकारणाने रंग बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या ताज्या ओपिनियन पोलने सर्वांची झोप उडाली आहे.

News18
News18
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये मागील तीन कार्यकाळांपासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. गेल्या 14 वर्षांपासून त्या सत्तेत आहेत. या निवडणुकीत TMC पुन्हा विजयी झाली, तर ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. असे झाले तर त्या सलग चार वेळा मुख्यमंत्री होणाऱ्या देशातील पहिल्या महिला ठरतील. जयललीता यांच्या नावावर पाच वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. मात्र त्या 1991 ते 2016 या काळात वेगवेगळ्या कार्यकाळात मुख्यमंत्री होत्या. पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओपिनियन पोल समोर आला असून राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षण संस्था Matrize-IANS ने केलेल्या या ओपिनियन पोलमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC+) आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर भाजप आघाडी (BJP+) दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.
advertisement
या सर्वेनुसार पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागांपैकी बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. ओपिनियन पोलमध्ये TMC+ आघाडीला सुमारे 155 ते 170 जागा मिळू शकतात, असे सांगितले गेले आहे. त्याचबरोबर या आघाडीला सुमारे 43 ते 45 टक्के मतांची टक्केवारी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ सध्याच्या राजकीय परिस्थितीत तृणमूल काँग्रेसला मतदारांचा मजबूत पाठिंबा मिळत असल्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळतात.
advertisement
दुसरीकडे BJP+ आघाडीला या निवडणुकीत 110 ते 115 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास भाजप आघाडीला सुमारे 41 ते 43 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात भाजप मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहू शकतो; मात्र बहुमतापासून तो काहीसा दूर राहू शकतो, असे चित्र दिसते.
advertisement
याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळून 5 ते 7 जागा मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. या गटाला सुमारे 13 ते 15 टक्के मतांची टक्केवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Matrize-IANS च्या या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस आघाडी सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निवडणुकीदरम्यान होणारे प्रचार, स्थानिक मुद्दे आणि मतदारांचा अंतिम कल यावर प्रत्यक्ष निकाल अवलंबून असेल.
view comments
मराठी बातम्या/देश/
पश्चिम बंगालचा सर्वात Latest ओपिनियन पोल, आकडे पाहून राज्यात खळबळ उडाली; कोणाला किती जागा?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement