Weather Alert: मार्चच्या मध्यावर धोका वाढला, महाराष्ट्रावर नवं संकट, 72 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पुढील 72 तासांसाठी काही भागात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा पारा चाळिशी पार गेला असून गेल्या आठवड्याभरात उष्णतेच्या लाटेचे चटके सहन करावे लागले. या आठवड्यात राज्यावर हवामानाचं नवं संकट घोंघावत आहे. पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 16 मार्च रोजी मध्य महाराष्ट्रसह विदर्भ आणि मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सर्वच जिल्ह्यांतील तापमानात काहीशी घट झाली आहे. उष्णतेची लाट ओसरली असून आता अवकाळी संकट घोंघावत आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. 16 मार्चला सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
मराठवाड्याला देखील उष्णतेच्या लाटेनंतर अवकाळी संकटाचा सामना करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील 24 तासांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. कमाल तापमान 34-38 अंशांवर राहील.
advertisement
विदर्भात सोमवारपासून अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे. ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पुढील 4 दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान राहील. त्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवेल.
advertisement
advertisement
दरम्यान, मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात उष्णतेच्या लाटेने हैराण केल्यानंतर दुसऱ्या पंधरवाड्याची सुरुवात अवकाळी संकटाने होत आहे. 16 मार्चपासून 72 तास राज्यात अस्मानी संकटाचा धोका राहील. त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीला आलेली पिके आणि फळबागांची योग्य काळजी घ्यावी लागेल. तसेच उष्णतेचा पारा अधिक असल्याने आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.





