advertisement

8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन

Last Updated:

8th Pay Commission: केंद्र सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तांच्या पगार, पेन्शन व भत्त्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Rapid Read
News18
News18
नवी दिल्ली: नोव्हेंबर 2025 मध्ये अधिकृतपणे भारत सरकारकडून 8वा वेतन आयोग स्थापन केला आहे. हा आयोग सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगाची जागा घेणार आहे, जो 2016 पासून लागू आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू केली असून या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये बदल होणार आहेत.
पगारात किती वाढ होऊ शकते?
तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगानुसार पगारात सुमारे 20 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 दरम्यान राहू शकतो.
कर्मा मॅनेजमेंट ग्लोबलचे तज्ज्ञ प्रतीक वैदयांच्या मते 8व्या वेतन आयोगाचे अंतिम आकडे महागाईचा कल, सरकारची आर्थिक स्थिती आणि 16th Finance Commission यांच्या शिफारशींवर अवलंबून असतील. त्यांनी सांगितले की 6व्या वेतन आयोगाच्या काळात सरासरी सुमारे 40 टक्के पगारवाढ झाली होती. तर सातव्या वेतन आयोगाचा एकूण परिणाम वेतन आणि भत्त्यांवर 23 ते 25 टक्क्यांच्या दरम्यान होता. त्या वेळी 2.57 चा समान फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता.
advertisement
तसेच अंतिम निर्णय पुढील 12 ते 18 महिन्यांत महागाई, 16व्या वित्त आयोगानंतरची आर्थिक परिस्थिती, करसंकलन आणि सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
30 एप्रिल 2026 पर्यंत सूचना देण्याची संधी
सध्या अर्थ मंत्रालयाने एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून त्याद्वारे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, कर्मचारी संघटना आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना मागवण्यात येत आहेत. या सूचना देण्यासाठीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत खुली राहणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये अधिकृत अधिसूचना जारी झाल्यानंतर आयोगाला आपला अंतिम अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
advertisement
7व्या वेतन आयोगानुसार किमान पगार 18,000 रुपये
भारतामध्ये वेतन सुधारण्याचा मोठा इतिहास आहे. यापूर्वी 2016 मध्ये सातव्या वेतन आयोग लागू करण्यात आला होता. या आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा किमान मूलभूत पगार 18,000 रुपये करण्यात आला होता, तर कमाल मूलभूत पगार 2.5 लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आला होता. सध्या अधिक फिटमेंट फॅक्टर लागू करून किमान वेतन वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अंतिम आर्थिक बदल सरकारने आयोगाचा अंतिम अहवाल मंजूर केल्यानंतरच लागू केले जातील.
advertisement
कर्मचाऱ्यांना एरिअर कधी मिळेल?
8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून एरिअर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जरी सरकारला अंतिम शिफारशी मंजूर करण्यासाठी वेळ लागला तरी एरिअरची गणना त्या तारखेपासून होऊ शकते. GenZCFO चे संस्थापक सीए मनीष मिश्रा यांच्या मते, एरिअरची गणना 1 जानेवारी 2026 पासून केली जाऊ शकते. हीच तारीख 7व्या वेतन आयोगाचा कालावधी संपण्याची अंतिम तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पैसे नंतर मिळाले तरी गणना या तारखेपासून होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
Next Article
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी? एक्सपर्टनी सांगितले नवे कॅल्क्युलेशन
8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग, पगारवाढीचा सस्पेन्स संपणार; किती होणार सॅलरी?
  • 8व्या वेतन आयोगाबाबत तज्ज्ञांचा मोठा अंदाज

  • कोणाला किती फायदा?

  • या तारखेपासून मिळणार एरिअर

View All
advertisement