advertisement

Pimpri Chinchwad Fire: रुपीनगरमध्ये सिलिंडरचा जबरदस्त स्फोट, आगीने घेतला रौद्र अवतार

Last Updated:

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील रुपीनगर परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

News18
News18
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील रुपीनगर परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. एका दुकानातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून, यात एका बससह शेजारील भंगाराची दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले होते. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरल्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न केले. लगेचच शर्थीचे प्रयत्न करत मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास एका दुकानात अचानक गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि जवळच असलेल्या भंगार बाजाराला आगीने आपल्या कवेत घेतले. आगीच्या भक्ष्यस्थानी भंगार बाजाराच्या जवळ उभी असलेली एक खासगी बसही आली. आगीचे लोट आणि धुराचे लोट दूरवर दिसत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पिंपरी- चिंचवड अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले. मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्फोटामध्ये दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी लगेचच आग विझवण्याचे प्रयत्न केल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. आगीच्या भक्ष्यस्थानी भंगार बाजाराच्या जवळ उभी असलेली एक खासगी बसही आली होती. खासगी बसला आणि भंगार बाजाराला मोठ्या प्रमाणावर आग लागल्यामुळे आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोट परिसरात पसरले होते. आग परिसरात फार दुरवर दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी बससह शेजारील भंगाराचे दुकाने जळून खाक झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad Fire: रुपीनगरमध्ये सिलिंडरचा जबरदस्त स्फोट, आगीने घेतला रौद्र अवतार
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement