Gold New Rule: उद्यापासून सोनं खरेदीची नवी पद्धत, दरवाढीच्या धास्तीपासून सुटका; घोषणेने बाजारपेठेत खळबळ, काय आहे नियम?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold Futures: राष्ट्रीय शेअर बाजाराने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात 10 ग्रॅम सोन्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची सुरुवात करण्याची घोषणा केली असून ते 16 मार्च 2026 पासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : देशातील आघाडीचा शेअर बाजार NSEने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागात 10 ग्रॅम सोन्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. हा नवा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 16 मार्च 2026 पासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध होणार आहे. एक्सचेंजने यापूर्वीच आपल्या सदस्यांना कळवले होते की या उत्पादनासाठी आवश्यक मंजुरी SEBI कडून मिळाली आहे.
20 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेडिंग युनिट आणि डिलिव्हरी युनिट दोन्ही 10 ग्रॅम असतील. या कॉन्ट्रॅक्टचे ट्रेडिंग सिम्बॉल GOLD10G असे असेल.
सोन्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट हा एक असा कायदेशीर करार आहे. ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता भविष्यातील एका निश्चित तारखेला, पूर्वनिर्धारित किंमतीवर सोन्याचा ठराविक साठा (उदा. 1 किलो किंवा 100 ट्रॉय औंस) खरेदी किंवा विक्री करण्याचे मान्य करतात. हे करार MCX सारख्या एक्सचेंजवर व्यवहार केले जातात. कराराच्या वेळीच सोन्याची किंमत निश्चित केली जाते, ज्यामुळे भविष्यातील किंमत वाढीचा धोका टाळता येतो.
advertisement
गोल्ड ट्रेडिंगचा वेळ
या कॉन्ट्रॅक्टमध्ये ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11:30 किंवा 11:55 पर्यंत होणार आहे. ट्रेडिंगचा हा वेळ अमेरिकेतील डेलाइट सेव्हिंग टाइमनुसार ठरवण्यात आला आहे. एक्सचेंजच्या माहितीनुसार या कॉन्ट्रॅक्टची किंमत 10 ग्रॅम सोन्याच्या आधारावर कोट केली जाईल. यामध्ये किमान किंमत बदल (टिक साइज) 10 ग्रॅममागे 1 रुपया असेल.
advertisement
बेस प्राइस लिमिट
NSE ने या कॉन्ट्रॅक्टसाठी दैनिक बेस प्राइस लिमिट 6 टक्के निश्चित केली आहे. जर किंमत या मर्यादेपेक्षा जास्त बदलली तर 15 मिनिटांच्या कूलिंग-ऑफ कालावधीनंतर ही मर्यादा 9 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल. हे कॉन्ट्रॅक्ट मासिक फ्युचर्स स्वरूपात असतील. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कॅलेंडर दिवशी या कॉन्ट्रॅक्टचा शेवटचा ट्रेडिंग दिवस मानला जाईल. त्या दिवशी सुट्टी असल्यास त्याच्या आधीचा कामकाजाचा दिवस अंतिम ट्रेडिंग दिवस असेल.
advertisement
999 शुद्धतेचे सोने आवश्यक
डिलिव्हरीच्या बाबतीत या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनिवार्य डिलिव्हरीची अट असेल. त्यानुसार 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने देणे आवश्यक राहील. सर्क्युलरनुसार सोने सिरीयल नंबर असलेले असावे आणि ते London Bullion Market Association (LBMA) मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून किंवा NSE ने मान्यता दिलेल्या इतर पुरवठादारांकडूनच दिले जावे. तसेच त्या सोन्यासोबत पुरवठादाराचे गुणवत्ता प्रमाणपत्र देणेही बंधनकारक असेल.
advertisement
या कॉन्ट्रॅक्टच्या डिलिव्हरीसाठी अहमदाबाद येथे निश्चित केलेल्या क्लिअरिंग हाऊसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांनाही कमी प्रमाणात सोन्याच्या फ्युचर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 7:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold New Rule: उद्यापासून सोनं खरेदीची नवी पद्धत, दरवाढीच्या धास्तीपासून सुटका; घोषणेने बाजारपेठेत खळबळ, काय आहे नियम?






