34 वर्षांपूर्वीची कल्ट फिल्म, जिने बरबाद केलं अभिनेत्याचं करिअर! वयस्कर हिरोच्या प्रेमात पडली अभिनेत्री, ठरली डिझास्टर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Flop Film : बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे असतात जे काळाच्या खूप पुढे असतात. १९९१ मध्ये असाच एक सिनेमा रुपेरी पडद्यावर धडकला, ज्याने त्या काळात खळबळ उडवून दिली होती.
बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे असतात जे काळाच्या खूप पुढे असतात. १९९१ मध्ये असाच एक सिनेमा रुपेरी पडद्यावर धडकला, ज्याने त्या काळात खळबळ उडवून दिली होती. दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अनिल कपूरचा तो वेगळा अंदाज आणि श्रीदेवीचा अविस्मरणीय अभिनय... हा आहे क्लासिक कल्ट सिनेमा 'लम्हे' (Lamhe).
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दीपक मल्होत्राचं नशीब इतकं बलवत्तर होतं की 'लम्हे' रिलीज होण्यापूर्वीच त्याला 'डर', 'जुनून' आणि 'सूर्यवंशी' सारखे मोठे चित्रपट मिळाले होते. पण 'लम्हे' रिलीज झाला आणि दीपकच्या अभिनयाचे वाभाडे निघाले. यश चोप्रा यांनी त्याला आपल्या पुढच्या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. बघता बघता 'लम्हे'ने दीपकच्या बॉलिवूडमधील स्वप्नांचा चक्काचूर केला. त्यानंतर तो सिनेसृष्टीतून गायबच झाला.
advertisement
'लम्हे' फ्लॉप झाल्यावर यश चोप्रा खूप खचले होते. त्यांना वाटलं होतं की लोक या आधुनिक कथेला स्वीकारतील, पण तसं झालं नाही. मात्र, आज ३४ वर्षांनंतर हा चित्रपट हिंदी सिनेमातील सर्वात उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो. अनिल कपूरचा तो मॅच्युअर लूक आणि श्रीदेवीने साकारलेला आई-मुलीचा डबल रोल आजही चर्चेचा विषय ठरतो.





