advertisement

वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा, पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट, असा आहे नवीन प्लॅन

Last Updated:

अखेर ही मागणी पूर्ण होणार असून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पुणे-शिरूर महामार्गाच्या उन्नतीकरण प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.

सरकारचा मास्टर प्लॅन, पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट
सरकारचा मास्टर प्लॅन, पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट
पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार असून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पुणे-शिरूर महामार्गाच्या उन्नतीकरण प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या संकल्पनेवर आधारित या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वर खालच्या स्तरावर 6 लेनचा उन्नत रस्ता बांधला जाणार असून, त्याच्यावर रामवाडी ते वाघोली या मार्गावर मेट्रो मार्गाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
पुणे-शिरूर महामार्गाचा होणार कायापालट
पुणे-शिरूर महामार्ग प्रकल्पाअंतर्गत वाघोली येथे विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच संयुक्त पाहणी पार पडली. या प्रकल्पासाठी मेट्रो मार्गासाठी अंदाजे 3,666.24 कोटी रुपये तर 53.40 कि.मी. लांबीच्या 6 लेन उन्नत महामार्गासाठी सुमारे 7,515 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) पद्धतीने राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित महामार्गावर अनेक अंडरपास, स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र एक्झिट मार्ग तसेच आधुनिक सुविधा असलेला रुंद मार्ग उभारला जाणार आहे. यामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होईल आणि वाहतूक कोंडीचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मिटणार आहे.
advertisement
वाघोली येथे झालेल्या संयुक्त पाहणीदरम्यान रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाच्या तांत्रिक बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला. पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ आणि त्यांच्या पथकाने प्रस्तावित मार्गाची बारकाईने पाहणी केली. या बैठकीत वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, आमदार ज्ञानेश्वर कटके, महापारेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. पाहणीदरम्यान या प्रकल्पावर सर्व बाजूने चर्चा करण्यात आली आहे.
advertisement
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले की, यावर सविस्तर अहवाल सादर केला जाईल आणि लवकरच प्रकल्पाच्या कामाची सुरुवात केली जाईल. या प्रकल्पामुळे शिरूर-हवेली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र, आयटी कंपन्या तसेच एमआयडीसीला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय, पुणे-नगर मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होऊन वेळ आणि इंधनाची बचत होईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा, पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट, असा आहे नवीन प्लॅन
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement