advertisement

Pune Metro: आयटीयन्सचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न पुन्हा लांबणीवर; आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नवा मुहूर्त

Last Updated:

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ (Line 3) बद्दल मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मेट्रोसाठीची प्रतीक्षा आणखी लांबली असून, आता हा मार्ग दोन टप्प्यांत सुरू होणार आहे

आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नवा मुहूर्त (फाईल फोटो)
आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नवा मुहूर्त (फाईल फोटो)
पुणे: पुणेकर आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ (Line 3) बद्दल मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मेट्रोसाठीची प्रतीक्षा आणखी लांबली असून, आता हा मार्ग दोन टप्प्यांत सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दोन टप्प्यांत होणार मेट्रो सुरू:
शिवाजीनगर ते हिंजवडी या २३ किलोमीटरच्या मार्गापैकी
पहिला टप्पा: हिंजवडी ते बालेवाडी फाटा (१२ किमी) - मे महिन्यात सुरू होईल.
दुसरा टप्पा: बालेवाडी फाटा ते शिवाजीनगर (११ किमी) - जुलै महिन्यात सुरू होईल.
का रखडले काम?
पंतप्रधानांच्या हस्ते २०१८ मध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता. मार्च २०२६ पर्यंत मेट्रो धावेल असा दावा 'पीएमआरडीए'ने (PMRDA) केला होता, मात्र तो फोल ठरला आहे. २३ पैकी सुमारे १० ते १२ स्थानकांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. प्रवासी जिने, लिफ्ट आणि तांत्रिक चाचण्यांची प्रक्रिया बाकी असल्याने हा मुहूर्त तिसऱ्यांदा हुकला आहे. यामुळे आयटीयन्सना आणखी काही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
मेट्रो भवनचे उद्घाटन:
रविवारी शिवाजीनगर येथे भव्य 'मेट्रो भवन'चे उद्घाटन करण्यात आले. ८,१५० चौ. मीटर क्षेत्रफळ असलेल्या या इमारतीत अत्याधुनिक नियंत्रण केंद्र आणि अनुभव केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भविष्यात 'टनेल नेटवर्क' (बोगद्यांचे जाळे) उभारण्याचे संकेतही दिले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: आयटीयन्सचं मेट्रो प्रवासाचं स्वप्न पुन्हा लांबणीवर; आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नवा मुहूर्त
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement