advertisement

छत्रपती संभाजीनगरात निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दिला दगा, पार्टीला बोलवलं अन्...

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांची हत्या
प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांची हत्या
छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजाराम उत्तम लोंढे असं हत्या झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. आरोपींनी केवळ हत्याच केली नाही, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा बनाव रचला होता. मात्र, गुन्हे शाखेनं केलेल्या सखोल तपासामुळे या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे.

५० लाखांचा व्यवहार आणि टीव्ही शोचे आमिष

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्राध्यापक लोंढे आणि मुख्य आरोपी विशाल राठोड यांच्यात सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. आरोपींनी 'खतरों के खिलाडी' सारखा एक मोठा टीव्ही रिअॅलिटी शो तयार करून त्यातून भरघोस नफा कमावण्याचं आमिष लोंढे यांना दाखवलं होतं. या कामासाठी त्यांनी मोठी रक्कम घेतली, मात्र बराच काळ उलटूनही त्यांनी कोणताही शो सुरू केला नाही. यामुळे प्राध्यापक लोंढे यांनी आपल्या पैशांसाठी आरोपींकडे तगादा लावला होता.
advertisement
पार्टीच्या बहाण्याने बोलावून त्यांच्याच पिस्तुलाने हत्या
सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून आरोपींनी लोंढे यांचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यांनी लोंढे यांना दौलताबाद परिसरात पार्टीसाठी बोलावले. तिथे मद्यप्राशन केल्यानंतर परतत असताना, आरोपींनी लोंढे यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी 'मास्टर प्लॅन'

खुनानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी सिनेस्टाईल प्लॅन केला. लोंढे जिवंत असल्याचा भास निर्माण करण्यासाठी आरोपींनी त्यांचा मोबाईल बराच वेळ ऑन ठेवला आणि तो शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवला. एवढंच नव्हे तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी एका जेसीबी चालकाला गाठलं. गेवराई तांड्या परिसरात गुप्तधन असल्याचा बनाव रचून त्यांच्याकडून दोन खड्डे खणून घेतले आणि पहाटेच्या सुमारास मृतदेह तिथे पुरला.
advertisement

असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश

६ फेब्रुवारी २०२६ रोजी लोंढे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेज तपासले असता विशाल राठोड आणि आकाश पवार यांच्या जबाबात तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून अशाप्रकारे एका निवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छत्रपती संभाजीनगरात निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दिला दगा, पार्टीला बोलवलं अन्...
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement