Unique Curry Recipe : चण्याची भाजी एकदा 'या' पद्धतीनं करा; बनवायला सोपी अन् चवीला अप्रतिम! पाहा सोपी रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Healthy and tasty palak chole recipe : या खास पद्धतीची चण्याची भाजी तुम्हाला आणि मुलांनाही नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे ही भाजी पालक घालून बनवली जाते. त्यामुळे मुलं पालक खात नसतील तर या भाजीमध्ये ते आवडीनं खातील.
मुंबई : रोज आपल्याला प्रश्न पडतो भाजीला काय करावं. त्यातही पालेभाज्या खायला मुलं कंटाळा करतात. मात्र मुलांना छोले पुरी खायला नक्कीच आवडतं. छोल्याची म्हणजेच चण्याची भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल. पण या खास पद्धतीची चण्याची भाजी तुम्हाला आणि मुलांनाही नक्कीच आवडेल. चला तर मग पाहूया पालक छोले कसे बनवायचे.
विशेष म्हणजे ही भाजी पालक घालून बनवली जाते. त्यामुळे मुलं पालक खात नसतील तर या भाजीमध्ये ते आवडीनं खातील. ही रेसिपी foodieklix या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला तर मग पाहूया खास पालक चण्याची भाजी कशी बनवायची.
पालक चण्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- पालक
- उकडलेले चणे
advertisement
- हंग करडा 2 टेबलस्पून
- मोहरीचे तेल 2 टेबलस्पून
- जिरे 1 टेबलस्पून
- हिंग 1/4 टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या 1 टेबलस्पून
- 2 कांदा
- आलं लसूण पेस्ट
- लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून
- हळद 1/4 टेबलस्पून
- जिरे पावडर 1 टेबलस्पून
- कोणताही सब्जी मसाला 1 टेबलस्पून
advertisement
- चाट मसाला 1/2 टेबलस्पून
- चवीनुसार मीठ
- कसुरी मेथी 1 टेबलस्पून
पालक चण्याची भाजी बनवण्याची पद्धत..
- सर्वात आधी पालक गरम पाण्यामध्ये हलका उकळून घ्या.
- त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि त्यासोबत थोडं दही टाकून प्युरी बनवून घ्या.
- आता एक एकढाईमध्ये मोहरीचं तेल टाकून गरम करा.
advertisement
- तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं, हिंग, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, टाकून ते परतून घ्या.
- त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, सब्जी मसाला, चाट मसाला आणि मीठ टाका.
- आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजू द्या.
- नंतर यामध्ये पालकाची प्युरी घाला आणि झाकून 5 मिनिटं शिजवा.
advertisement
advertisement
- आता यात कुकरमध्ये शिजवलेले चणे टाका.
- शेवटी कसुरी मेथी टाका. तुमची भाजी तयार होईल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Unique Curry Recipe : चण्याची भाजी एकदा 'या' पद्धतीनं करा; बनवायला सोपी अन् चवीला अप्रतिम! पाहा सोपी रेसिपी










