advertisement

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआय टेन्शनमध्ये, IPL सामने संकटात!

Last Updated:

आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता बीसीसीआयने 12 एप्रिलपर्यंतच्याच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआय टेन्शनमध्ये, IPL सामने संकटात!
निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआय टेन्शनमध्ये, IPL सामने संकटात!
मुंबई : आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता बीसीसीआयने 12 एप्रिलपर्यंतच्याच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं, ज्यात एकूण 20 सामन्यांचा समावेश होता. यानंतर आता रविवारी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आता बीसीसीआयला पुन्हा एकदा वेळापत्रकामध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने आसामसाठी 9 एप्रिल रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. आसामच्या 126 विधानसभा जागांसाठी गुरूवार 9 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आयपीएल वेळापत्रकामध्ये 7 एप्रिलला गुवाहाटीमध्ये सामना नियोजित आहे.

गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सचे तीन सामने

आसामच्या गुवाहाटीमधील बरसापारा स्टेडियममध्ये यंदा आयपीएलचे 3 सामने होणार आहे. हे मैदान राजस्थान रॉयल्सचं दुसरं होम ग्राऊंडदेखील आहे. राजस्थान रॉयल्सचे 3 सामने गुवाहाटीमध्ये होणार आहेत.
advertisement
पहिला सामना 30 मार्च रोजी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात होईल. तर दुसरा सामना 7 एप्रिलला राजस्थान आणि मुंबई यांच्यात असेल. तिसरा सामना 10 एप्रिलला राजस्थान आणि आरसीबी यांच्यात होईल. हे तिन्ही सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

वेळापत्रकात बदल होणार?

9 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांमुळे आयपीएल वेळापत्रक बदलले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळापत्रक जाहीर व्हायच्या आधी बीसीसीआयने सरकार आणि प्रशासनासोबत सल्लामसलत केलं असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आवश्यक परवानग्या आधीच मिळाल्या असतील, असं मानलं जात आहे.
advertisement

7 आणि 10 एप्रिलच्या सामन्यांवर संकट

आसाममध्ये 9 एप्रिलला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे 7 तारखेपासून निवडणूक प्रचार थांबेल. मतदानकेंद्रावर पोलीसही तैनात केले जातील. तर 9 एप्रिलला मदतान झाल्यानंतरही पोलिसांसमोर सुरक्षेची आव्हानं असतील, त्यामुळे आयपीएलच्या या दोन सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

सुरक्षेचं आव्हान

निवडणुकीदरम्यान सुरक्षा हे एक मोठे आव्हान असते. निवडणुकीची तयारी सामान्यतः मतदानाच्या 1-2 आठवडे आधी सुरू होते. या काळात, पोलीस आणि सुरक्षा दलांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय, आसामची सीमा बांगलादेशशी जोडली गेली आहे, ज्यामुळे आव्हानांची संख्या आपोआप वाढते. अशा परिस्थितीमध्ये आयपीएल सामन्यांना सुरक्षा देणं कठीण होईल.
advertisement

आयपीएलचं उर्वरित शेड्युल लवकरच

दरम्यान बीसीसीआय आयपीएल 2026 च्या उरलेल्या सामन्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे, त्यामुळे गुवाहाटीमधील सामन्यांच्या तारखा बदलल्या जाणार का? याचा सस्पेन्सही तेव्हाच संपेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआय टेन्शनमध्ये, IPL सामने संकटात!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement