IPL टीम ताब्यात घेण्यासाठी महाभारत, ललित मोदी कमबॅक करणार... नवा मालक कोण?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना मोठी अपडेट समोर येत आहे. आयपीएलची पहिली चॅम्पियन टीम लवकरच नव्या मालकाकडे जाणार आहे.
मुंबई : आयपीएल सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना मोठी अपडेट समोर येत आहे. आयपीएलची पहिली चॅम्पियन राजस्थान रॉयल्स लवकरच नव्या मालकाकडे जाणार आहे. जागतिक गुंतवणूक बँक 'द रॅन ग्रुप' या मोठ्या डीलची देखरेख करत आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार या डिलसाठी टीमची व्हॅल्यूएशन जवळपास 1.1 बिलियन डॉलर निश्चित करण्यात आली आहे.
वेबसाईट खेल नाऊ च्या रिपोर्टनुसार विक्री प्रक्रियेशी जोडल्या गेलेल्या हितधारकांची महत्त्वाची बैठक सोमवार 16 मार्चला होणार आहे. या बैठकीमध्ये विक्रीचा पुढचा टप्पा आणि बोली लावण्याबद्दलच्या प्रस्तावावर अंतिम चर्चा व्हायची शक्यता आहे. सध्या राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व वेंचर कॅपटलिस्ट मनोज बदाले यांच्याकडे आहे. मनोज बदाले यांच्याकडे राजस्थान रॉयल्सचा 65 टक्के वाटा आहे, तर रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सकडे 15 टक्के, लाचलान मर्डोक यांच्याकडे 13 टक्के आणि इतर शेयर धारकांकडे 7 टक्के हिस्सा आहे, ज्यात इयान मॅकिनॉन आणि कल सोमानी यांचाही समावेश आहे.
advertisement
रेसमध्ये 4 दिग्गज ग्रुप
राजस्थान रॉयल्सला विकत घेण्यासाठी चार मोठे ग्रुप समोर आले आहेत. यातले काही ग्रुप आरसीबीच्या संभाव्य विक्रीवरही लक्ष ठेवून आहेत. बिर्ला ग्रुपने अमेरिकन गुंतवणूकदार डेव्हिड ब्लिट्जरसोबत मिळून रस दाखवला आहे. ब्लिट्जर आधीपासूनच जागतिक स्तरावर फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये गुंतवणूकदार आहेत.
निकेश अरोरासोबत लंडन स्पिरिटमध्ये 49 टक्के हिस्सा असलेले गजवानीही या रेसमध्ये आहेत. गजवानी अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटच्या संस्थापक गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. उद्योजक कल सोमानी आणि आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्या कंसोर्टियमनेही राजस्थान रॉयल्सची टीम विकत घेण्यात रस दाखवला आहे.
advertisement
मागच्या एका दशकापासून आयपीएलचं बाजार मूल्य वाढत चाललं आहे. व्यावसायिक मुल्याच्याबाबतीत आता फक्त अमेरिकेची नॅशनल फुटबॉल लीग आयपीएल पुढे आहे. आयपीएलचं मूल्य वाढण्याचं प्रमुख एक कारण मीडिया राईट्स आहे. 2023-2027 या कालावधीमध्ये ब्रॉडकास्ट आणि डिजीटल राईट्स 6.2 मिलियन डॉलरमध्ये विकले गेले होते, ज्यामुळे प्रत्येक टीमची ब्रँड व्हॅल्यू कमालीची वाढली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 11:03 PM IST








