advertisement

आसामच्या ओपिनियन पोलचा निकाल जाहीर, राज्यात राजकीय समीकरणे बदलणार; नंबर्स पाहून शांतता, कोणाचा होणार सुफडा साफ?

Last Updated:

Assam Opinion Poll: आसाम विधानसभा निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आलेल्या ओपिनियन पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेनुसार राज्यात भाजपचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

News18
News18
दिसपूर: आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्येही राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर Matrize-IANS या सर्वेक्षण संस्थेने ओपिनियन पोल जाहीर केला असून त्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजप आघाडीचे वर्चस्व राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्वेनुसार आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत आणि बहुमतासाठी 64 जागांची आवश्यकता आहे. ओपिनियन पोलमध्ये BJP+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार भाजप आघाडीला सुमारे 96 ते 98 जागा मिळू शकतात. मतांच्या टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास या आघाडीला सुमारे 43 ते 45 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे वर्चस्व कायम राहू शकते, असे संकेत या सर्वेक्षणातून मिळतात.
advertisement
दुसरीकडे काँग्रेस आघाडी (Congress+) या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. या आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत काँग्रेस आघाडीला 39 ते 40 टक्के मते मिळू शकतात, असे या ओपिनियन पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीला काही प्रमाणात मतदारांचा पाठिंबा असला तरी बहुमताच्या शर्यतीत ती मागे पडू शकते, असे चित्र दिसते.
advertisement
याशिवाय इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळून 2 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. या गटाला अंदाजे 18 ते 20 टक्के मते मिळू शकतात, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.
Matrize-IANS च्या या ओपिनियन पोलनुसार असममध्ये पुन्हा एकदा भाजप आघाडीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निवडणूक प्रचार, स्थानिक प्रश्न, आघाड्यांचे राजकारण आणि मतदारांचा अंतिम कल यावरच प्रत्यक्ष निकाल अवलंबून असेल.
view comments
मराठी बातम्या/देश/
आसामच्या ओपिनियन पोलचा निकाल जाहीर, राज्यात राजकीय समीकरणे बदलणार; नंबर्स पाहून शांतता, कोणाचा होणार सुफडा साफ?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement