advertisement

PAK vs BAN : पाकिस्तानच्या कॅप्टननेच मॅच घालवली, जिंकणारी मॅच हारली,बांग्लादेशचा नाकावर टीचून विजय

Last Updated:

पाकिस्तानचा शेवटच्या ओव्हरला अवघ्या 14 धावांची गरज होती आणि कॅप्टन शाहिन शाह आफ्रिदी चांगला लयीत खेळते होता त्यामुळे तो सामना जिंकून देईल असे वाटत होते पण त्याने फक्त 2 धावा काढल्याने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला आहे.

Bangladesh defeat pakistan
Bangladesh defeat pakistan
Pakistan vs Bangladesh 3rd odi : ढाकाच्या शेरे बांग्ला नेशनल स्टेडिअममध्ये पार पडलेल्या सामन्यात अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा अवघ्या 11 धावांनी पराभव झाला आहे.या सामन्यात पाकिस्तानचा शेवटच्या ओव्हरला अवघ्या 14 धावांची गरज होती आणि कॅप्टन शाहिन शाह आफ्रिदी चांगला लयीत खेळते होता त्यामुळे तो सामना जिंकून देईल असे वाटत होते पण त्याने फक्त 2 धावा काढल्याने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला आहे. विशेष म्हणजे हा पराभव पाकिस्तानचा कॅप्टन शाहिन शाह आफ्रीदीमुळे झाला आहे.
बांग्लादेशने दिलेल्या 291 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात खूपच खराब झाली होती.कारण पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर साहिबजादा फरहान आणि माज सदाकत प्रत्येकी 6 धावांवर बाद झाले होते.त्यानंतर गाजी घोरी आणि मोहम्मद रिझवान मैदानात आला होता. दोघेही डाव सावरतील असे वाटत होते, पण मोहम्मद रिझवान 4 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर अब्दुल समद मैदानात आला. पण गाजी घोरी 29 वर बाद झाला.
advertisement
त्यानंतर सलमान आघाची मैदानात एंन्ट्री झाली.त्याने अब्दुल समदसोबत पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण नंतर तो 34 वर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ साद मसूद 38 वर तर फहीम अश्रम 9 वर बाद झाला होता. दरम्यान एका मागून एक विेकेट पडत असताना सलमान आगाने पाकिस्तानचा डाव सावरत 89 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती. ही त्याची वनडेतली तिसरी सेंच्यूरू होती. या सेंच्यूरीनंतर तो सैामना जिंकवेल असे वाटत होते त्याच्या जोडीला पाकिस्तानचा कॅप्टन शाहिन शाह आफ्रिदी होता.दोघांनी मिळून सामना अटीतटीचा केला होता.कारण शाहिन शाह आफ्रीदी खुपच हळू खेळत होता आणि सलमान आघाला स्ट्राईकच देत नव्हता.त्यात स्ट्राईक मिळताच सलमान मोठा शॉर्ट खेळायला गेला आणि 106 धावांवर आऊट झाला होता.
advertisement
आघा आऊट झाल्यानंतर पाकिस्तानचा 14 बॉल 30 धावा हव्या होत्या. त्यातल्या सुरुवातीच्या आठ बॉलमध्ये पाकिस्तानने 15 धावा काढल्या.त्यानंतर शेवटच्या ओव्हरला 14 धावा हव्या होत्या. यावेळी रिषाद होसनने आफ्रीदीला मारायची एकही संधी दिली नसल्याने त्या ओव्हरला फक्त 2 धावा आल्या आणि पाकिस्तानने हा सामना 11धावांनी हारला.आणि विजयसह बांग्लादेशने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 ने जिंकली.
advertisement
बांग्लादेशच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर तांजिद तमीमच्या 107 धावांच्या शतकीय आणि तौहीद हृदोयच्या 48 धावांच्या बळावर बांग्लादेशने 50 ओव्हरमध्ये 290 धावा केल्या होत्या.यावेळी पाकिस्तानकडून हॅरीस रौफने 3,शाहिन आफ्रिदी आणि अबरार अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : पाकिस्तानच्या कॅप्टननेच मॅच घालवली, जिंकणारी मॅच हारली,बांग्लादेशचा नाकावर टीचून विजय
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement