advertisement

Vasai Virar News : वसईच्या हॉटेल चालकाच मोठं कांड, तुडवडा असताना केला जुगाड, महापालिकेची मोठी कारवाई

Last Updated:

वसईतील नालानाका नवजीवन परिसरातील लजीज हॉटेलमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

vasai  news
vasai news
Vasai Virar News : विजय देसाई, प्रतिनिधी, वसई-विरार: वसईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गॅसचा तुडवडा असताना एका गॅस चालकाने मोठा कांड केला आहे. हॉटेलचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी जुगाड केला पण हाच जुगाड त्याला भारी पडला आहे.कारण अन्न व नागरी पुरवठा विभागाने हॉटेलवर छापा टाकून हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
वसईतील नालानाका नवजीवन परिसरातील लजीज हॉटेलमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस सिलेंडर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कारवाईत हॉटेल मालकांसह कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व नागरी पुरवठा विभागाला गुप्त बातमीदारामार्फत नालानाका नवजीवन परिसरातील लजीज हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १४ मार्च २०२६ रोजी अधिकाऱ्यांनी हॉटेलवर छापा टाकला.यावेळी हॉटेलमध्ये काम करणारा शरीफ मोहम्मद (वय ४८) हा मालपुवा आणि जिलबी तळण्याचे काम करताना आढळून आला. तपासणीदरम्यान टेबलखाली १४.२ किलो वजनाचा घरगुती भारत कंपनीचा गॅस सिलेंडर वापरात असल्याचे आढळले.
advertisement
हॉटेलचे मालक फारुख अहमद खान (वय ५७) आणि जाकीर कासम जगरार (वय ५१) यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करून गॅस सिलेंडरसह लोखंडी कढई, ठेगडी आणि इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५ हजार ४७० रुपये असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी तिघांविरोधात बीएनएस २०२३ चे कलम २८७ आणि २८८, तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि एलपीजी पुरवठा वितरण नियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी पेल्हार पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar News : वसईच्या हॉटेल चालकाच मोठं कांड, तुडवडा असताना केला जुगाड, महापालिकेची मोठी कारवाई
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement