advertisement

इटलीच्या मिल्ट्री बेसवर इराणचा भयानक हल्ला, एक विमान उद्ध्वस्त, आता Nato ची एन्ट्री होणार?

Last Updated:

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चाललं आहे. कुवेतमधील आपल्या हवाई तळाला लक्ष्य केल्याचं वृत्त रविवारी इटालियन सरकारने दिलं आहे.

इटलीच्या मिल्ट्री बेसवर इराणचा भयानक हल्ला, एक विमान उद्ध्वस्त, आता Nato ची एन्ट्री होणार?
इटलीच्या मिल्ट्री बेसवर इराणचा भयानक हल्ला, एक विमान उद्ध्वस्त, आता Nato ची एन्ट्री होणार?
नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चाललं आहे. कुवेतमधील आपल्या हवाई तळाला लक्ष्य केल्याचं वृत्त रविवारी इटालियन सरकारने दिलं आहे. आमचे सैनिक सुरक्षित आहेत, पण एक रिमोट ऑपरेटेड विमान नष्ट झाल्याची माहिती इटलीच्या सरकारने दिली आहे.
कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळावर अमेरिका आणि इटालियन सैन्य आहे, तिथे ड्रोन हल्ला करण्यात आल्याचं इटलीच्या सरकारने सांगितलं आहे. इटालियन संरक्षण प्रमुख लुसियानो पोर्तोलानो यांनी लष्कराने जारी केलेलं निवेदनात हे म्हटलं आहे. 'आज सकाळी, कुवेतमधील अली अल सलेम हवाई तळाला लक्ष्य करण्यात आले. या तळावर अमेरिकन आणि इटालियन लष्करी दल तैनात आहेत. सर्व सैनिक सुरक्षित आहेत पण एक विमान नष्ट झाले आहे', अशी माहिती पोर्तोलानो यांनी सांगितलं आहे.
advertisement

युद्ध परिस्थितीमुळे सैन्य कमी

गेल्या काही दिवसात या प्रदेशातील वाढत्या सुरक्षा धोक्यामुळे हवाई तळावर तैनात असलेल्या सैन्याची संख्या कमी करण्यात आली आहे. सध्या या तळावर उपस्थित असलेले सैन्य महत्त्वाचे काम करण्यासाठी समर्पित आहे, असं इटालियन संरक्षण प्रमुखांनी सांगितलं.
आखाती देशांमधील कोणतेही अमेरिकन तळ किंवा सहयोगी देशांना सोडणार नसल्याचा इशारा इराणने याआधी दिला होता, त्यानंतर आता कुवेतमधील अमेरिका आणि इटलीच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
advertisement

नाटोची एन्ट्री होणार?

इटली आणि अमेरिका दोघेही नाटोचे महत्त्वाचे सदस्य आहेत, त्यामुळे या संघर्षात आता नाटोची एन्ट्री व्हायची शक्यता आहे. इराणने उडवलेल्या ड्रोनने यापूर्वी तुर्की आणि फ्रान्समधील तळांना लक्ष्य केले आहे. पण तेव्हा नाटोने कोणतेही गंभीर विधान जारी केलेले नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इटलीच्या मिल्ट्री बेसवर इराणचा भयानक हल्ला, एक विमान उद्ध्वस्त, आता Nato ची एन्ट्री होणार?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement