Adiraj Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ महाराज यांचा मोठा अधिकार आहे. बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात.
Adiraj Maharaj : साहेबराव कोकाणे : बीडच्या श्रीक्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच वार धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांना अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते.यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.त्यामुळे भक्तांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. दरम्यान या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ महाराज यांचा मोठा अधिकार आहे. बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान आज आदिनाथ महाराज यांनी आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गडावरच सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर ठेवलं आणि ते एकटे खोलीत गेले.त्यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच वार केले होते. या घटनेनंतर त्यांना अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होते.यावेळी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर
डॉक्टर हर्षवर्धन तनवर यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती.आता त्यांची प्रकृती स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नसून भक्तांनी महाराजांना आठ दिवस भेटणे टाळावं जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही असं आवाहन डॉक्टर तन्वर यांनी केलं आहे.
तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले व आमदार मोनिका राजळे हे रुग्णालयात दाखल झाले त्यांनी महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली.महाराजांवर शस्त्रक्रिया झाली असून ती अत्यंत व्यवस्थित झाली असुन कोणत्याही अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केली आहे.
advertisement
आदिनाथ महाराज यांनी असे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविक भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परीवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यान त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 12:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Adiraj Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट








