Dombivli News : तो खेळ शेवटचा ठरला; आई सावरण्यासाठी येईपर्यंत सारं काही संपलं; कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
Last Updated:
Dombivli : लहान मुलं घरातून खेळायला जाताय आणि परत येईलं असं एका आईला वाटलं पण तिच्या समोर काही वेळात एक दुर्देवी घटना समोर आलेली आहे. या घटनेने डोंबिवली शहर हादरुन गेलं आहे.
डोंबिवली : डोंबिवली शहरात राहत असलेल्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांतील कृष्णा खेळण्यासाठी गेलेला तो परतलाच नाही. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तो खेळ शेवटचा ठरला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत बालकाचे नाव कृष्णा यादव (वय7) असून तो कुटुंबीयांसोबत डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी या भागात राहतो. ही घटना रविवारी घडली असून त्या दिवशीही सर्व काही दररोज सारखा दिवस उजाडला आणि रविवार असल्याने घरातील सर्वजण घरातही होते.
"लवकर येतो" म्हणणारा चिमुकला
कृष्णा ही रविवारी सकाळी उठल्यानंतर खेळण्यासाठी आईला सांगून घराबाहेर पडला. चिमुकल्यालाही आईने बाहेर जाताना प्रेमाने बाय केले. कृष्णा बिल्डिंगमधील मागील बाजूस खेळण्यासाठी गेला काही वेळ सर्व व्यवस्थित सुरु होते. पण खेळता खेळता कृष्णाचा बॉल विद्युत डीपीच्या ठिकाणी गेला. मग तोच बॉल काढण्यासाठी तो गेला असता त्याचा स्पर्श त्याच डीपीला झाला आणि त्यात त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
advertisement
कृ्ष्णासोबत घडलेल्या या घटनेने बिल्डिंगमधील नागरिक तात्काळ तिथं जमा झाले परंतू तो पर्यंत चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सध्या टिळकनगर पोलिसांत दाखल करण्यात आलेली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 8:46 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News : तो खेळ शेवटचा ठरला; आई सावरण्यासाठी येईपर्यंत सारं काही संपलं; कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश







