IPL 2026 : पाकिस्तानी क्रिकेटरमुळे ट्रोल, कॅप्टनकडून मिळाला धोका! काव्या मारनने 48 तासात घेतला मोठा निर्णय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ishan Kishan SRH Captain : पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टन्सीचा प्रश्न निर्माण झाला असून, ईशान किशनला IPL 2026 मध्ये हैदराबादचे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. T20 WC विजयानंतर ईशानचा फॉर्म जोरदार आहे.
IPL 2026, Sunrisers Hyderabad captain : आयपीएल खेळण्याची स्टाईल ज्या संघाने बदलली त्याचं पूर्ण श्रेय जातं, सनरायझर्स हैदराबादला... सनरायझर्स हैदराबादच्या सलामी जोडीने आयपीएलला नवी कलाटणी दिली. नव्या आक्रमक पद्धतीने क्रिकेट खेळण्याची कला एसआरएचने आयपीएलला दिली. अशातच आता सनरायझर्स हैदराबाद आगामी आयपीएलमध्ये नव्या कॅप्टनच्या रुपात दिसू शकते. पाकिस्तानी खेळाडूला घेतल्यानंतर ट्रोल झालेली काव्या मारन आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
हैदराबादच्या कॅप्टनसीबाबत मोठा सस्पेन्स
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. यंदाचा आयपीएलचा ओपनिंग सामना डिफेन्डिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या मॅचपूर्वी हैदराबादच्या कॅप्टनसीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. पॅट कमिन्स जुलै 2025 पासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असल्यानं त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे सनरायझर्सला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.
advertisement
पॅट कमिन्स अद्याप फिट नाही
अॅशेस सीरिजमधील एक मॅच खेळल्यानंतर पॅट कमिन्स मैदानापासून लांब आहे, तसेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 मध्ये देखील तो खेळू शकला नव्हता. त्यामुळे हैदराबादची धाकधूक वाढली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला अद्याप फिट घोषित केलं नाही. यामुळे कमिन्सच्या अनुपस्थितीत टीमची धुरा कोण सांभाळणार, याची चर्चा रंगली आहे. कमिन्स यंदा आयपीएलमधून मुकू शकतो. अशातच मोठी बातमी समोर येतीये.
advertisement
CAPTAIN ISHAN KISHAN FOR SRH
- Ishan Kishan is the front runner to be Captain of Sunrisers Hyderabad as there is no clarity on Pat Cummins. [Pratyush Raj] pic.twitter.com/YpL66263py
— Johns. (@CricCrazyJohns) March 16, 2026
ईशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्वासाठी सज्ज
advertisement
टीम इंडियाचा छोटा पॅकेट बडा धमाका असलेला स्फोटक विकेटकीपर बॅटर ईशान किशन आता सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात ईशानने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हैदराबाद मॅनेजमेंटने कमिन्सच्या जागी ईशानला योग्य पर्याय मानले असून त्याच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार समोर आली आहे.
advertisement
ईशान किशनचा कॅप्टनसीचा रेकॉर्ड
ईशान किशनला आयपीएलच्या कॅप्टन्सीचा अनुभव नाहीये. त्याने एकाही मॅचमध्ये कॅप्टन्सी केली नाही. अशातच कमिन्स नाही तर मग कोण? असा सवाल विचारला जातोय. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील त्याला पुरेशी कॅप्टन्सीची संधी मिळाली नाही. पण ईशान किशनचा टी-20 मधील कॅप्टनसीचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. त्याने 29 मॅचेसमध्ये नेतृत्व करताना 23 विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे ट्रेव्हिस हेडला वगळून ईशानला संधी दिली जाईल का? असा सवाल विचारला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 8:30 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पाकिस्तानी क्रिकेटरमुळे ट्रोल, कॅप्टनकडून मिळाला धोका! काव्या मारनने 48 तासात घेतला मोठा निर्णय!







