advertisement

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी: वढू बुद्रूकच्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Pune News: छत्रपती संभाजी महाराजांच्या 337 व्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी: वढू बुद्रूकच्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी: वढू बुद्रूकच्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या 337 व्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. 17 मार्चला रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्चला रात्री 10 वाजेपर्यंत वढू बुद्रूक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणते मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?
कोरेगाव भीमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक थेट मार्गाने सोडण्यात येणार नाही. ही वाहतूक कोरेगाव भीमा – सणसवाडी – शिक्रापूर – गॅस फाटा – वाजेवाडी चौफुला या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळ बाजूकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला – गॅस फाटा – शिक्रापूर – सणसवाडी – कोरेगाव भीमा या मार्गाने सोडण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
advertisement
कोरेगाव भीमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळ निश्चित करण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण आणि पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू–वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंगसाठी ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटपर्यंतच परवानगी राहणार आहे. या ठिकाणाच्या पुढे कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी: वढू बुद्रूकच्या वाहतुकीत मोठे बदल, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement