Stuffed Pomfret : घरीच या पद्धतीनं बनवा भरलेला पापलेट; बाहेरून बनेल क्रिस्पी, आतून होईल मऊ आणि ज्युसी!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Stuffed Pomfret Fry Recipe In Marathi : आज आम्ही तुम्हाला भरलेला पापलेटची एक अगदी सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही पापलेट बनवला तर तो बाहेरून मस्त क्रिस्पी होईल, तर आतून एकदम मऊ आणि ज्यूसी बनेल.
मुंबई : बहुतांश मासे प्रेमींना पापलेट खायला आवडतंच. बाहेर हॉटेलमध्ये मिळणारं भरलेलं पापलेट खूप महाग असतं. पण आपण घरी बनवलं तरी त्याची चव अगदी तशी येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भरलेला पापलेटची एक अगदी सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही पापलेट बनवला तर तो परफेक्ट बनेल.
ही पद्धत खूप खास आहे. या पद्धतीने तुम्ही भरलेलं पापलेट बनवल्यास तो बाहेरून मस्त क्रिस्पी होईल, तर आतून एकदम मऊ आणि ज्यूसी बनेल. ही रेसिपी flavoursby_shivani या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. चला पाहूया, परफेक्ट भरलेला पापलेट कसा बनवायचा.
मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य..
- 2 स्वच्छ केलेले पापलेट
- 1 मोठा चमचा हळद
advertisement
- 1 मोठा चमचा मीठ
- लिंबाचा रस
- 2 मोठे चमचे कोकम
- 2 लहान चमचे तिखट
- 1 मोठा चमचा मालवणी मसाला
हिरवा मसाला बनवण्यासाठीच साहित्य..
- मूठभर कोथिंबीर
- मूठभर पुदिना
- 7 ते 8 लसूण पाकळ्या
- 5 ते 6 हिरव्या मिरच्या
- ओले खोबरे
- 1 इंच आल्याचा तुकडा
advertisement
- तेल
- लिंबाचा रस
- मीठ
पापलेट तळण्यासाठी साहित्य
- 1 कप बारीक रवा
- 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ
- तेल
भरलेला पापलेट बनवण्याची पद्धत..
- पापलेट स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांच्या दोन्ही बाजूंवर काप द्या.
- पापलेटना हळद, मीठ, लिंबाचा रस, कोकम, तिखट आणि मालवणी मसाला लावून घ्या. 15-20 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवा.
advertisement
- त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, लसूण, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे आणि आले एकत्र वाटून घ्या.
- ही वाटलेली पेस्ट थोडेसे तेल घालून, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
- नंतर पापलेटच्या काप दिलेल्या भागांमध्ये हा हिरवा मसाला भरून घ्या.
- आता रवा आणि तांदळाचे पीठ यांचे मिश्रण करून घ्या आणि त्यामध्ये पापलेट घोळून घ्या.
advertisement
- पापलेट सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत 'शॅलो फ्राय' करा.
advertisement
तर अशाप्रतकारे तुमचा भरलेला पापलेट तयार आहे. हा पापलेट गरम असतानाच वाढा. पाप्लेटवर लिंबाचा रस टाकल्यास त्यांची चव आणखी वाढते. तर एकदा हा भरलेला पापलेट घरी नक्की ट्राय करून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Stuffed Pomfret : घरीच या पद्धतीनं बनवा भरलेला पापलेट; बाहेरून बनेल क्रिस्पी, आतून होईल मऊ आणि ज्युसी!








