advertisement

Pune News: पुणेकरांच्या गाड्यांना आता 'तीन अक्षरी' नंबरप्लेट! MH-12 मालिकेतील दोन अक्षरांचा कोटा संपणार; नवीन बदल काय?

Last Updated:

आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) दोन अक्षरी इंग्रजी वर्णमालेची मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच 'MH-12' अंतर्गत नोंदणी होणाऱ्या नवीन वाहनांना तीन अक्षरी वर्णमालेनुसार क्रमांक दिले जाणार आहेत.

पुणेकरांच्या गाड्यांना आता 'तीन अक्षरी' नंबरप्लेट
पुणेकरांच्या गाड्यांना आता 'तीन अक्षरी' नंबरप्लेट
पुणे : पुण्यातील वाहनांची संख्या इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहे की, आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (RTO) दोन अक्षरी इंग्रजी वर्णमालेची मालिका संपण्याच्या मार्गावर आहे. लवकरच 'MH-12' अंतर्गत नोंदणी होणाऱ्या नवीन वाहनांना तीन अक्षरी वर्णमालेनुसार क्रमांक दिले जाणार आहेत. पुणे आरटीओने यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (NIC) तसा प्रस्ताव पाठवला आहे.
का होतोय हा बदल?
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यांमध्ये इंग्रजी वर्णमालेच्या क्रमवारीनुसार वाहनांची नोंदणी केली जाते. पुण्यात आतापर्यंत 'AA' पासून सुरू झालेली मालिका 'ZG' पर्यंत पोहोचली आहे. साडेपाच कोटींहून अधिक वाहन क्रमांक वितरीत झाले आहेत. अशातच आता सण आणि मुहूर्तांमुळे वाढलेली वाहन विक्री पाहता लवकरच ही मालिका 'ZZ' पर्यंत पोहोचेल. त्यानंतर नवीन नोंदणीसाठी अक्षरे शिल्लक नसल्याने आता तीन अक्षरी (उदा. MH-12, AAA 5..9) मालिकेचे नियोजन सुरू आहे.
advertisement
पुणे आरटीओच्या नोंदीनुसार शहरात वाहनांचा महापूर आला आहे
दुचाकी: २९ लाख ८८ हजार ८१० (सर्वाधिक)
चारचाकी: ९ लाख १९ हजार ९६१
एकूण वाहने: ४३ लाख ५५ हजार ३८० (मार्च अखेरपर्यंत)
प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य परिवहन विभागाकडे लवकरच अंतिम प्रस्ताव पाठवून ही नवीन प्रणाली कार्यान्वित केली जाईल. यामुळे पुणे हे अशा प्रकारे तीन अक्षरी मालिका सुरू करणाऱ्या देशातील प्रमुख शहरांपैकी एक ठरेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांच्या गाड्यांना आता 'तीन अक्षरी' नंबरप्लेट! MH-12 मालिकेतील दोन अक्षरांचा कोटा संपणार; नवीन बदल काय?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement