advertisement

US Attack Iran Missile Depot: २३ क्विंटल वजन आणि भयंकर विनाश! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या मिसाईल डेपोचा पाचोळा, 'होर्मुझ' पेटणार?

Last Updated:

Iran Missile Depot : इराणसोबतच्या युद्धात मित्रराष्ट्रांनी साथ सोडल्यानंतर अमेरिकेने आता 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ इराणच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अमेरिकेने हल्ले सुरू केले आहेत.

२३ क्विंटल वजन आणि भयंकर विनाश! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या मिसाईल डेपोचा पाचोळा, 'होर्मुझ' पेटणार?
२३ क्विंटल वजन आणि भयंकर विनाश! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या मिसाईल डेपोचा पाचोळा, 'होर्मुझ' पेटणार?
वॉशिंग्टन/होर्मुझ: इराणसोबतच्या युद्धात मित्रराष्ट्रांनी साथ सोडल्यानंतर अमेरिकेने आता 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ (होर्मुझची समुद्रधुनी) इराणच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अमेरिकेने थेट महाविनाशक बॉम्बफेक सुरू केली आहे. अमेरिकेने ५००० पाउंड (सुमारे २३ क्विंटल) वजनाचे 'डीप पेनिट्रेटर' बॉम्ब वापरून इराणच्या किनारपट्टीवरील क्षेपणास्त्र तळांचा चक्काचूर केला आहे.

२३ क्विंटलच्या बॉम्बनं हादरला इराण...

यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणने होर्मुझ समुद्रधुनीच्या किनाऱ्यावर अत्यंत मजबूत क्षेपणास्त्र साठे आणि लॉन्चिंग साइट्स तयार केल्या होत्या. येथून आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात होते. हे धोके नष्ट करण्यासाठी अमेरिकेने जमिनीच्या आत खोलवर घुसून स्फोट करणाऱ्या शक्तिशाली बॉम्बचा वापर केला. या हल्ल्यात इराणच्या अनेक क्रूझ मिसाइल साइट्स उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
advertisement
advertisement

नाटोची साथ नाही, ट्रम्प यांचा एकला चलो रे!

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझचा मार्ग मोकळा करण्यासाठी नाटो (NATO) आणि इतर मित्रराष्ट्रांकडे मदत मागितली होती. मात्र, अनेक देशांनी या युद्धात उडी घेण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी "अमेरिका हे काम एकटाच करू शकतो" असे म्हणत थेट कारवाईचे आदेश दिले. आशियाई देशांसाठी इराणने हा मार्ग खुला ठेवला असला, तरी अमेरिका आणि युरोपसाठी तो बंद होता, जो आता बळाचा वापर करून उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
advertisement

इराणच्या वर्चस्वाला धक्का

यापूर्वी अमेरिकेने इराणच्या 'खार्ग' बेटावरही हल्ले केले होते. खार्ग वरील लष्करी तळ उद्धवस्त केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. आम्ही या ठिकाणच्या इराणच्या तेल साठ्यावरही हल्ला केला असता. मात्र, तसे केले नाही मात्र यापुढे हा त्यालाही लक्ष्य करणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला होता. त्यानंतर आता थेट मिसाइल तळांना लक्ष्य करून अमेरिकेने युद्धाचा 'गेम' पलटवला आहे. इराणच्या सागरी सामर्थ्याला हा मोठा धक्का मानला जात असून, यामुळे होर्मुझमधील इराणची पकड सैल होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
US Attack Iran Missile Depot: २३ क्विंटल वजन आणि भयंकर विनाश! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या मिसाईल डेपोचा पाचोळा, 'होर्मुझ' पेटणार?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement