Oppo च्या दमदार 5G फोनची एंट्री! मिळते 7000mAh बॅटरीसह 50MP कॅमेरा, किंमत फक्त...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
ओपोचा एक नवा फोन भारतात नुकताच लॉन्च झालाय. या मिड रेंज फोनमध्ये तुम्हाला भारी कॅमेरासह जबरदस्त बॅटरीही मिळणार आहे. चला पाहूया या फोनच्या डिटेल्सविषयी....
ओपोच्या एका भारी फोनने मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. ज्यामुळे आता मिडरेंजमध्ये फोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक जबरदस्त ऑप्शन मिळाला आहे. आपोने भारतात आपला K14 सीरीजचा दुसरा फोन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये दमदार बॅटरी, मजबूत बिल्ड आणि शानदार फीचर्स मिळतात. हा फोन तीन वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. सोबतच हा फोन लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
advertisement
advertisement
advertisement
ओप्पो K14 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन : ओपो K14 5G एक ड्यूअल-सिम स्मार्टफोन आहे. जो अँड्रॉइड 15 वर बेस्ड कलर OS 15 वर चालतो. यामध्ये 6.75-इंचांचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. ज्यामुळे यूझर्सला स्मूद आणि ब्राइज व्हिज्युअल एक्सपीरियन्स मिळतो.
advertisement
advertisement
कॅमेरा सेटअपविषयी बोलायचं झाल्यास, या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा AI प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आलाय. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही यात आहे. फोनमध्ये AI फीचर्स आहेत. ज्यामध्ये AI Eraser 2.0, AI Clarity Enhancer आणि AI Perfect Shot चा समावेश आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव बेस्ट होतो.
advertisement
सर्वात पॉवरफूल आहे बॅटरी : बॅटरीच्या तुलनेत हा फोन खुप खास आहे. कारण यामध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीनुसार हा फोन एकदा चार्ज केल्यावर मोठा बॅटरी बॅकअप देतो. यामध्ये YouTube व्हिडिओ प्लॅबॅक, मॅप्स नेव्हिगेशन आणि व्हिडिओ कॉलिंगसारखे कामं ही दीर्घकाळ केली जाऊ शकतात. यासोबतच फोनमध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिग देण्यात आली आहे. ज्यामुळे फोन पाणी आणि धुळपासून सुरक्षित राहतो.







