Mumbai Local : ठाणे स्थानकावर न उतरता रेल्वेनं नवी मुंबई गाठा; बदलापूरकरांसाठी गेम चेंजर निर्णय
Last Updated:
Badlapur To Navi Mumbai : बदलापूरकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईच्या दिशेने लोकल प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.
बदलापूर : बदलापूर, अंबरनाथ या भागातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुंबईत कामाने जात असतात. त्यात सध्या बदलापूर तसेच आसपासच्या परिसरातील वाढत्या प्रवासी संख्येमुळे उपनगरी रेल्वेगाडीचा प्रवास दररोज जीवघेणा ठरत आहे. पण आता बदलापूरमधील प्रवाशांना थेट नवी मुंबई लोकल सेवा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बदलापूर ते घणसोली थेट प्रवास होणार शक्य?
बदलापूर आणि वांगणीदरम्यान कासगाव या नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीसंदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरु झाल्या असून रेल्वे प्रशासनाने यासाठी प्रस्ताव मागिवला आहे तर कासगाव ते नवी मुंबईतील कामोठेपर्यंत नव्या रेल्वे मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवर यांनी दिले आहे. जर भविष्यात या प्रकल्पाला मंजूरी मिळाली तर बदलापूर ते थेट नवी मुंबई असा उपनगरीय रेल्वेगाडीने प्रवास करता येणार आहे.
advertisement
सकाळी उपनगरीय रेल्वेगाड्या प्रवाशांनी भरुन जात असतात. त्यातही चुकूनही उपनगरीय रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले तर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. बदलापूर स्थानकातील समस्या आणि अनेक अपुऱ्या सुविधांबाबत कुळगाव- बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यात प्रवाशाची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांवरील वाढता ताण या सर्व समस्यांबाबत मंत्र्यांसमोर सांगितल्या.
advertisement
या लेखाजोख्यात बदलापूर रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला रेल्वे मंत्र्यानी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना या विषयीची सविस्त अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 8:57 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Mumbai Local : ठाणे स्थानकावर न उतरता रेल्वेनं नवी मुंबई गाठा; बदलापूरकरांसाठी गेम चेंजर निर्णय









