advertisement

वाढदिवसाच्या पार्टीत कॉलेज तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीच्या बर्थडेला आली अन् दगा झाला

Last Updated:

एका १९ वर्षीय कॉलेज तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
एका १९ वर्षीय कॉलेज तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टी सुरू होती. दरम्यान, एका ओळखीच्या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. ज्यावेळी अत्याचार झाला, तेव्हा पीडित तरुणीने मद्यसेवन केलं होतं. याचाच फायदा आरोपीनं घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा तरुणीला शुद्ध आली, तेव्हा तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. यानंतर तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ही घटना हरयाणा राज्यातील गुरुग्राममध्ये घडली आहे. गुरुग्राममधील सेक्टर ३३ मधील एका हाऊस पार्टीमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार झाला आहे. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दिल्लीतून आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगालची असून ती दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत आहे. शनिवारी ती आपल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गुरुग्राममधील सेक्टर ३३ मधील एका फ्लॅटवर आली होती. या हाऊस पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
advertisement

पार्टीमध्ये ओळखीचा फायदा घेतला

या पार्टीमध्ये मद्यप्राशन सुरू होते. पीडित तरुणीच्या मैत्रिणीच्या माध्यमातूनच 'दिव्यम' (वय २९) नावाचा आरोपी या पार्टीत सामील झाला होता. पार्टी सुरू असताना आणि पीडितेनं देखील मद्यसेवन केलं होतं. ती नशेत असताना आरोपीने तिच्या असहायतेचा फायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
advertisement

आरोपीला दिल्लीतून अटक

पीडितेच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी दिव्यमचा शोध सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्लीतून आरोपीला बेड्या ठोकल्या. सोमवारी त्याला शहर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
वाढदिवसाच्या पार्टीत कॉलेज तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीच्या बर्थडेला आली अन् दगा झाला
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement