IPL 2026 मध्ये रोहित शर्मा नाही तर सूर्या 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून खेळणार? महिला जयवर्धनेने स्पष्टच सांगितली पांड्याची गेमप्लॅन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahela jayawardene On Rohit Sharma Roll : रोहित शर्मा एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येणार असून तो 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून नव्हे, तर पूर्णवेळ खेळाडू म्हणून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
IPL 2026 Mumbai Indians : टीम इंडियाचा स्टार प्लेयर हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी आयपीएल खेळणार आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी आता मुंबईचे खेळाडू सराव करत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच मुंबई इंडियन्यचा कोच महिला जयवर्धने याने रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. यावेळेस रोहित शर्मा एका नव्या रूपात चाहत्यांच्या भेटीला येणार असून तो 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून नव्हे, तर पूर्णवेळ खेळाडू म्हणून खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
रोहितने कौशल्यांवर कसून काम केलं - जयवर्धने
'MI ज्युनियर 2026' च्या अंतिम सामन्यादरम्यान बोलताना जयवर्धने याने बोलताना सांगितलं की, रोहित शर्माने मागील काही महिन्यात खूप मेहनत घेतली आहे. गेल्या एका आठवड्यात, त्याने आपल्या कौशल्यांवर कसून काम केलं आहे आणि सराव शिबिराच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच तो आमच्यात सामील झाला आहे. नेट्समधील सरावादरम्यान तो चांगल्या लयीत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी रोहितच्या रोलविषयी माहिती दिली.
advertisement
रोहित संघाचे नेतृत्व आघाडीवरून करेल - जयवर्धने
अनुभवी खेळाडू म्हणून तो मॅच दरम्यान टीमला मोलाचे मार्गदर्शन करत राहील, अशी आशा कोचनी व्यक्त केली आहे. रोहितचे एक नवीन रूप आहे. तो आता अधिक तंदुरुस्त आणि पूर्णपणे समर्पित वाटत आहे. तो संघाचे नेतृत्व आघाडीवरून करेल, अशी मला अपेक्षा आहे, असंही जयवर्धने यावेळी म्हणाला. त्यावेळी त्याने सूर्यकुमार यादवच्या फॉर्मवर देखील भाष्य केलं.
advertisement
सूर्यकुमारच्या फॉर्मबद्दल काळजी नाही -जयवर्धने
सूर्यकुमारला आपल्या फॉर्मबद्दल फारशी काळजी वाटत नाही, असं जयवर्धने म्हणाला. सूर्या एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि अगदी योग्य वेळी संघासाठी मोलाचे योगदान देतो. होय, सातत्य हा असा एक घटक असतो, ज्यावर त्याला नक्कीच काम करायची गरज आहे. परंतु ज्या पद्धतीने त्याने संघाचे नेतृत्व केले, ते खरोखरच कौतुकास्पद आहे, असं जयवर्धने म्हणाला. त्यामुळे यावेळी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सूर्याला खेळवणार की काय? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
जसप्रीत बुमराहचं कौतुक
दरम्यान, जयवर्धने याने यावेळी जसप्रीत बुमराहचं देखील कौतुक केलं. बुमराहची कामाप्रती असलेली निष्ठा आणि खेळाला समजून घेण्याची त्याची पद्धत अद्वितीय आहे, असं जयवर्धने म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 8:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 मध्ये रोहित शर्मा नाही तर सूर्या 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून खेळणार? महिला जयवर्धनेने स्पष्टच सांगितली पांड्याची गेमप्लॅन!










