IPL 2026 आधी RCB च्या गोत्यातून आली गुड न्यूज, विराटचा आनंद गगनात मावेना, अखेर डील फिक्स झाली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
RCB home ground at Chinnaswamy Stadium : डिफेन्डिंग चँम्पियन आरसीबीची डील फिक्स झाली असताना आता बंगळुरूमधून खुशखबर समोर आली आहे. नेमकं काय झालं? पाहा
RCB Chinnaswamy Stadium IPL 2026 : यंदाच्या आयपीएल 2026 ला येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. 11 दिवसानंतर आयपीएल 2026 चा पहिला सामना खेळवला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (28 मार्च — RCB vs SRH) यांच्यात हा सामना खेळवला जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचला आहे. अशातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फॅन्ससाठी गुड न्यूज समोर आली आहे. डिफेन्डिंग चॅम्पियनआरसीबीची डील फिक्स झाली असताना आता बंगळुरूमधून खुशखबर समोर आली आहे. नेमकं काय झालं? पाहा
चिन्नास्वामी वेन्यूला अंतिम मंजुरी
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी नियुक्त केलेल्या विशेष समितीने शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमची अत्यंत बारकाईने पाहणी केली होती. दिवसभर चाललेल्या या ऑडिटमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर तपासणी करण्यात आली अन् त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला. सोमवार रोजी कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA), आरसीबीचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे अध्यक्ष जी. महेश्वर राव यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर या वेन्यूला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
advertisement
आरसीबीच्या एकूण 5 मॅचेस चिन्नास्वामीवर
यंदाच्या हंगामात चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या एकूण 5 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. उर्वरित 2 होम मॅचेस रायपूरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर पार पडतील, अशी माहिती समोर आलीये. आरसीबी फ्रँचायझी आणि छत्तीसगड सरकारमध्ये एक करार झाल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे आता बंगळुरूच्या फॅन्सला आरसीबीचे पाच सामने चिन्नास्वामी स्टेडियवर पाहता येणार आहेत.
advertisement
चिन्नास्वामीवर 'डिजिटल क्यूआर' कोड तिकीट प्रणाली
त्याचबरोबर चिन्नास्वामी स्टेडियममधील गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी आरसीबीने 'डिजिटल क्यूआर' कोड तिकीट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांना एन्ट्री मिळवताना कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि रांगांची समस्या देखील कमी येणार आहे. केएससीएने स्टेडियमच्या चहुबाजूंनी 6 नवीन गेट्स तयार केले असून जुने दरवाजे अधिक रुंद केले आहेत.
advertisement
स्टँडपर्यंत पोहोचणे अधिक सोपं
दरम्यान, जुन्या एनसीए परिसरात फॅन्ससाठी विशेष 'होल्डिंग एरिया' तयार करण्यात आला असून इथं रॅम्प आणि टार्पोलिन शीट्स बसवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रेक्षकांना आपल्या स्टँडपर्यंत पोहोचणे अधिक सोपं होणार आहे. यामुळे चेंगराचेंगरी सारखी घटना होणार नाही, याची खबरदारी कर्नाटक क्रिकेट असोशिएशनकडून घेण्यात येत आहे.
Location :
Bangalore [Bangalore],Bangalore,Karnataka
First Published :
Mar 17, 2026 11:18 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 आधी RCB च्या गोत्यातून आली गुड न्यूज, विराटचा आनंद गगनात मावेना, अखेर डील फिक्स झाली!









