Motorolaचा प्रीमियम फ्लिप फोन 20 हजार रुपयांनी झाला स्वस्त! झटपट होतोय ऑर्डर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
विविध ई-कॉमर्स साइटवर अनेक मोबाईल्सवर डिस्काउंट्स ऑफर सुरू असते. अनेकदा महागडा फोनही यावर खुप स्वस्त मिळतोय. सध्या मोटोरोला रेज 40 अॅमेझॉनवर अगदी स्वस्तात मिळतोय.
मुंबई : तुम्हाला प्रिमियम स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. यातही तुम्हाला फोल्डेबल स्मार्टफोन हवा असेल आणि तुमचं बजेटही जास्त नसेल ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मोटोरोलाचा स्टायलिश फ्लिप फोन मोटोरोला रेज 40 आता मोठ्या डिस्काउंटसह तुम्ही खरेदी करू शकता.
advertisement
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत सध्या 39,999 रुपये करण्यात आली आहे. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 59,999 रुपये होते. म्हणजेच या फोनवर थेट 20 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काउंट मिळतंय. या व्यतिरिक्त तुम्ही अॅमझॉनवर ICICI बँक क्रॅडिक कार्डने पेमेंट केलं तर तुम्हाला 1,042 रुपयांचं अॅडिशनल डिस्काउंटही मिळू शकतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









