advertisement

ना मोठं बजेट, ना स्टारकास्ट पण जबरदस्त कथानक, 'फुला'चा टीझर चर्चेत

Last Updated:

Phula Teaser : ना मोठं बजेट ना मोठा स्टारकास्ट पण जबरदस्त कथानक असलेला फुलाचा टीझर रिलीज झाला आहे.1:15 सेकंदाच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

News18
News18
वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणाऱ्या "फुला" सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हा सिनेमा काय असणार, याची स्टोरी काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर सिनेमाचा टीझर समोर आला आहे. ना मोठं बजेट ना मोठा स्टारकास्ट पण जबरदस्त कथानक असलेला फुलाचा टीझर रिलीज झाला आहे.
'फुला' सिनेमाला अभिनेता सुबोध भावेचा आवाज लाभला आहे. अंगावर शहारे आणणारा 'फुला'चा टीजर रिलीज झाला आहे. वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. अभिनेता सुबोध भावे यांच्या धीरगंभीर आवाज असलेल्या टीजरने लक्ष वेधून घेतलं आहे. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा तयार केला आहे.
advertisement
'फुला' ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते.
साखळदंडानी बांधलेली, जमिनीवर आडवी झालेली, आजुबाजूला हळद पडलेली अशी फ्रेम, सुबोध भावे यांच्या आवाजात यत्र नार्यस्तू पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता या संस्कृत ओळींनी सुरू होणारा टीजर लक्ष वेधून घेतो. त्यानंतर एका मागोमाग एक देखण्या दृश्यप्रतिमांतून या चित्रपटाचा पोत कसा असेल याचा अंदाज बांधता येतो.
advertisement
एका मुलीच्या अस्तित्वावर निर्माण होणारा समाजाचा प्रश्न हा या चित्रपटातून मांडला जाणार आहे. त्यामुळे टीजरपासूनच या चित्रपटाने उत्सुकता निर्माण केली आहे. येत्या 17 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सिनेमात सात जबरदस्त गाणी असणार आहेत. ज्याला वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी आवाज दिला आहे. तर नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ना मोठं बजेट, ना स्टारकास्ट पण जबरदस्त कथानक, 'फुला'चा टीझर चर्चेत
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement