advertisement

Asha Bhosle : आर्टिस्टने लग्न करू नये! असं का म्हणाल्या होत्या आशा भोसले? लता दीदींबाबत म्हणाल्या... VIDEO

Last Updated:

Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कलाकारांच्या लग्नाविषयी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली.

News18
News18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ असून त्यामध्ये त्या गायक सोनू निगमबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत. या गप्पांमध्ये आशा भोसले यांनी कलाकारांच्या आयुष्याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं.
कार्यक्रमादरम्यान बोलताना आशा भोसले कलाकारांनी लग्न करू नये, असं म्हणाल्या. हे सांगताना त्यांनी आपल्या मोठ्या बहिणी आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला. आशा भोसले सोनू निगम यांच्याशी बोलताना म्हणाल्या की, "मी आता ज्या वयात आहे त्या वयात मला असं वाटतं की दीदींनी जे केलं ते खूप योग्य केलं. कोणत्याही आर्टिस्टने लग्न करू नये."
advertisement
या संवादादरम्यान आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणीही सांगितल्या. त्या म्हणाल्या की, "मी जेव्हाही दीदीकडे जायचे तेव्हा मी तिला म्हणायचे की, 'दीदी तू किती सुखी आहेस.' त्यावर दीदी म्हणायच्या, 'हो आशा मी खूप सुखी आहे.'
advertisement
आशा ताईंनी पुढे सांगितलं की, दीदी म्हणायची, "मी सगळ्यांकडे बघते, सगळ्यांच्या मुलांची अवस्था पाहते.  तेव्हा मला वाटतं की मी खूप सुखी आहे आशा. तुमच्यासारखे चार भाऊ-बहिण मला मिळाले आहेत, मी त्यातच आनंदी आहे."
advertisement
एका जुन्या मुलाखतीत बोलताना लता दीदी लग्नाविषयी म्हणाल्या होत्या, "मी नेहमी हाच विचार करते की, जन्म, लग्न आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसतं. ते होऊन जातं." हे सांगताना लता दीदी भावुक झाल्या होत्या.
advertisement
या व्हिडीओच्या निमित्तानं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा आयुष्याचा प्रवास पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. लता दीदींनी लग्न केलं नाही. त्या नेहमीच आपल्या गाण्याशी आणि कुटुंबाशी प्रामाणिक राहिल्या. गाणं आणि कुटुंब हेच त्यांचं आयुष्य होतं.
तर दुसरीकडे आशा भोसले यांनी फार कमी वयात लग्न केलं. लग्नात त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे अनेक वर्ष लता दीदींसोबतच्या नात्यात दुरावा आला होता. मात्र लता दीदी नेहमीच आशा ताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आशा ताईंच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये लता दीदींचा खूप मोठा वाटा आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Asha Bhosle : आर्टिस्टने लग्न करू नये! असं का म्हणाल्या होत्या आशा भोसले? लता दीदींबाबत म्हणाल्या... VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement