सावधान! हिंदू वर्षाच्या शेवटच्या अमावस्येला 'या' राशींवर ओढवणार संकट, सोसावे लागणार हाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिना हा वर्षातील शेवटचा महिना असतो आणि या महिन्यातील अमावस्या ही हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते. यंदा ही अमावस्या 18 मार्च 2026 रोजी सुरू होऊन 19 मार्च 2026 रोजी समाप्त होत आहे.
हिंदू पंचांगानुसार, फाल्गुन महिना हा वर्षातील शेवटचा महिना असतो आणि या महिन्यातील अमावस्या ही हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या मानली जाते. यंदा ही अमावस्या 18 मार्च 2026 रोजी सुरू होऊन 19 मार्च 2026 रोजी समाप्त होत आहे. धार्मिक दृष्टिकोनातून याला 'दर्श अमावस्या' म्हणतात. ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार, वर्षाची ही शेवटची अमावस्या 4 राशींसाठी काहीशी आव्हानात्मक किंवा 'अनलकी' ठरू शकते.
advertisement
मिथुन - मानसिक ताण आणि द्विधा मनस्थिती: वर्षाच्या शेवटी ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काहीशी गोंधळाची असू शकते. अमावस्येच्या प्रभावामुळे निर्णय घेताना तुमची द्विधा मनस्थिती होईल. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद टाळा, अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. या दिवशी महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळणेच हिताचे ठरेल.
advertisement
advertisement
advertisement
मीन - भावनिक अस्थिरता: वर्षातील शेवटची अमावस्या मीन राशीत किंवा या राशीच्या जवळ असणाऱ्या नक्षत्रांत घडत असल्याने, तुम्हाला भावनिक धक्के बसू शकतात. प्रिय व्यक्तींशी असलेले मतभेद वाढण्याची शक्यता आहे. या काळात नकारात्मक विचार मनात घर करतील, ज्यामुळे कामात लक्ष लागणार नाही. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







