सकाळच्या नाश्त्याचं टेन्शन सोडा, गव्हापासून तयार करा खास पापडा, वर्षभर टिकेल
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
साध्या गव्हापासून तयार होणारा हा पदार्थ चविष्ट तर असतोच, पण वर्षभर साठवून ठेवता येतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा पापडा झटपट बनवता येत असल्यामुळे ग्रामीण भागात तो मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो.
उन्हाळा आला की घराघरांत वर्षभर टिकणारे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. शेवया, पापड, कुरडया यांसोबतच विदर्भात आणखी एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे गव्हाचा पापडा. साध्या गव्हापासून तयार होणारा हा पदार्थ चविष्ट तर असतोच, पण वर्षभर साठवून ठेवता येतो. सकाळच्या नाश्त्यासाठी हा पापडा झटपट बनवता येत असल्यामुळे ग्रामीण भागात तो मोठ्या प्रमाणावर तयार केला जातो. त्याची रेसिपी आपण जाणून घेऊया.
advertisement
गव्हाचे पीठ तयार करण्याची पद्धत : पापडा बनवण्यासाठी सर्वप्रथम गहू स्वच्छ धुवून घ्यावे. साधारण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात म्हणजेच 5 किलो किंवा जास्त लागत असल्यास तसे घेऊ शकता. गहू दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतल्यानंतर ते पाणी झरणाऱ्या टोपलीत काढून ठेवावेत. दिवसभर त्यातील अतिरिक्त पाणी निघू द्यावे.
advertisement
यानंतर हे गहू स्वच्छ कपड्यात बांधून रात्रभर ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे गहू गिरणीत दळून आणावेत. दळून आणलेले पीठ आधी साध्या चाळणीतून आणि नंतर बारीक चाळणीतून दोन ते तीन वेळा चाळून घ्यावे. त्यामुळे पीठ अगदी बारीक आणि मैद्यासारखे मऊ होते. चाळताना त्यातून थोडा रवा देखील वेगळा होतो; हा रवा सुद्धा पापडा तयार करताना वापरला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








