advertisement

Gautam Gambhir VIDEO : 'मी देखील माणूसच, माझ्याकडूनही चूका...', कोहली-रोहित सोबतच्या नात्यावर गंभीर पहिल्यांदाच बोलला

Last Updated:

एका मुलाखतीत गौतम गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नात्यावर मोठं विधान केलं आहे. या दरम्यान तो काय बोलला आहे? हे जाणून घेऊयात.

gautam gambhir reaction on rohit sharma and virat kohli
gautam gambhir reaction on rohit sharma and virat kohli
Gautam Gambhir News : दिल्लीत बीसीसीआयचा नंमन सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्याला टीम इंडियाच्या खेळाडूंसह टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीर देखील उपस्थित होता. या सोहळ्यानंतर एका मुलाखतीत गौतम गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नात्यावर मोठं विधान केलं आहे. या दरम्यान तो काय बोलला आहे? हे जाणून घेऊयात.
मी देखील माणूस आहे, मला देखील चुका करण्याची संधी दिली पाहिजे.खेळाडूंना देखील चुका करण्याचा अधिकार आहे. मागच्या 18 महिन्यात माझ्याकडून चुका झाल्या असतील, पण या चुकांपासून मी मागे हटलो नाही, असे गौतम गंभीरने रेव्ह स्पोर्टसने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.मी एक गोष्ट नक्कीच मानतो की चांगल्या हेतून घेतलेला निर्णय स्विकारला जाऊ शकतो. पण चुकीच्या हेतूने घेतलेला निर्णय ड्रेसिंग रुममध्ये स्विकारला जाणार नाही, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
advertisement
advertisement
तसेच जिथपर्यंत मी ड्रेसिंग रुममध्ये उभं राहुन ईमानदारीने त्याच्या डोळ्यात पाहून बोलू शकतो.तिथपर्यंत मला वाटतं मी माझी जबाबदारी व्यवस्थितरीत्या सांभाळतो आहे,असे गंभीर म्हणाला आहे. दरम्यान गंभीर कोच बनल्यानंतर काही महिन्यांनी भारताचे दोन सगळ्यात अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.हा निर्णय बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या भारतीय संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर आला होता.यासोबत भारताचे न्यूझीलंड विरूद्ध टेस्ट सिरीजचा निकाल देखील निराशाजनक आला होता.यानंतर बीसीसीआयने टीमच्या प्रदर्शनाची समीक्षा केली आणि काही सूचना केल्या होत्या.
advertisement
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रेड बॉल क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर भारताच्या टेस्ट टीममध्ये बदलाचा काळ सूरू झाला. युवा खेळाडूंना जास्त संधी द्यायला सुरुवात केली. टेस्ट टीमची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली.त्यानंतर गंभीर आणि शुभमन गिल जोडीने इंग्लंड विरूद्ध टेस्ट सिरीज ड्रॉ केली आणि वेस्ट इँडिजला घरात हरवलं होतं.पण साऊथ आफ्रिकेविरूद्ध दोन टेस्ट सामन्यात टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
advertisement
विराट कोहली आणि रोहित शर्मा आता भारतासाठी वनडे फॉरमॅटमध्ये खेळतायत.दोघांची नजर सध्या 2027 च्या वर्ल्ड कपवर आहे. पण टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांनी स्पष्ट केले होते की वर्ल्ड कप टीममध्ये त्यांची जागाही आपोआप निश्चित केली जाणार नाही आणि निवड केवळ कामगिरीवर आधारीत असेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Gautam Gambhir VIDEO : 'मी देखील माणूसच, माझ्याकडूनही चूका...', कोहली-रोहित सोबतच्या नात्यावर गंभीर पहिल्यांदाच बोलला
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement