Car Tips : उन्हाळ्यात अशी घ्या कारची काळजी; इंजिन आणि पेंट दोन्ही राहिल सेफ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कडक उन्हाचा फटका केवळ माणसांनाच नाही, तर तुमच्या लाडक्या वाहनालाही बसतो. वाढत्या तापमानामुळे कारचं इंजिन, टायर आणि बॅटरीवर प्रचंड ताण येतो. अनेकदा आपण पाहतो की उन्हाळ्यात हायवेवर एखादी गाडी अचानक बंद पडते किंवा टायर फुटल्यामुळे अपघात होतात.
मुंबई : सध्या घराबाहेर पडलं की अंगाची लाहीलाही व्हायला लागली आहे. दुपारी 12 च्या सुमारास रस्त्यावरून गाडी चालवताना वाफा निघताना दिसतात. आपण स्वतःला उन्हापासून वाचवण्यासाठी गॉगल्स, स्कार्फ किंवा सनस्क्रीन वापरतो, पण तुमच्या घराबाहेर उभ्या असलेल्या किंवा रस्त्यावर धावणाऱ्या कारचं काय?
कडक उन्हाचा फटका केवळ माणसांनाच नाही, तर तुमच्या लाडक्या वाहनालाही बसतो. वाढत्या तापमानामुळे कारचं इंजिन, टायर आणि बॅटरीवर प्रचंड ताण येतो. अनेकदा आपण पाहतो की उन्हाळ्यात हायवेवर एखादी गाडी अचानक बंद पडते किंवा टायर फुटल्यामुळे अपघात होतात. तुमची कार अशा संकटात सापडू नये असं वाटत असेल, तर उन्हाळा पूर्णपणे तापण्यापूर्वी काही गोष्टींची तपासणी करणं अनिवार्य आहे.
advertisement
1. इंजिनला 'कूल' ठेवा: कूलंटकडे दुर्लक्ष नको
उन्हाळ्यात कारचं इंजिन स्वतःच खूप उष्णता निर्माण करतं आणि बाहेरचं तापमान 40°C च्या पार गेल्यावर इंजिनवर दुहेरी ताण येतो.
काय कराल: गाडीचं इंजिन पूर्णपणे थंड असताना 'रिझर्व्होअर टँक'मधील कूलंटची पातळी तपासा. कूलंट इंजिनमधील उष्णता शोषून घेण्याचं काम करतं. जर कूलंट कमी असेल तर इंजिन 'ओव्हरहीटिंग' होऊन गाडी मध्येच बंद पडू शकते.
advertisement
2. इंजिन ऑईल आणि इतर फ्लूइड्सची तपासणी
जास्त तापमानामुळे इंजिन ऑईलची गुणवत्ता लवकर खराब होऊ शकते. ऑईल जर खराब झालं किंवा कमी झालं, तर इंजिनच्या भागांमधील घर्षण वाढून मोठे नुकसान होऊ शकते.
'डिपस्टिक'च्या मदतीने ऑईल लेव्हल तपासा. त्यासोबतच ब्रेक फ्लूइड, ट्रान्समिशन फ्लूइड आणि पॉवर स्टीयरिंग फ्लूइड योग्य प्रमाणात आहेत की नाही याची खात्री करा. हे सर्व घटक तुमच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
advertisement
3. टायर प्रेशर: उन्हात टायर का फुटतात?
विज्ञानाचा एक साधा नियम आहे. उष्णतेमुळे हवा विस्तारते. उन्हाळ्यात रस्त्याचं तापमान खूप जास्त असतं, ज्यामुळे टायरमधील हवेचा दाब आपोआप वाढतो. जर टायरमध्ये आधीच हवा जास्त असेल, तर लांबच्या प्रवासात टायर फुटण्याचा (Tyre Burst) धोका असतो.
महत्त्वाची टीप: महिन्यातून किमान एकदा टायर प्रेशर तपासा. पण लक्षात ठेवा, टायर प्रेशर नेहमी 'कोल्ड टायर' (गाडी न चालवता) असतानाच तपासावे. टायरला कुठे कट किंवा तडे गेले आहेत का, यावरही नजर ठेवा.
advertisement
4. बॅटरीची 'लाईफ' वाढवा
अनेकांना वाटतं की बॅटरी फक्त हिवाळ्यात त्रास देते, पण वास्तव उलट आहे. कडक उन्हामुळे बॅटरीमधील लिक्विड (Electrolyte) लवकर सुकते आणि अंतर्गत रासायनिक प्रक्रिया वेगवान होते. यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होतं.
काय काळजी घ्याल: बॅटरीचे टर्मिनल्स स्वच्छ ठेवा आणि त्यावर गंज (Corrosion) चढला असेल तर तो काढून टाका. तुमची बॅटरी 3 वर्षांपेक्षा जुनी असेल, तर एकदा तज्ज्ञांकडून ती तपासून घेणं कधीही चांगलं.
advertisement
उन्हाळ्यात कारची देखभाल करणं म्हणजे केवळ एसी चालू करणं नव्हे, तर गाडीच्या अंतर्गत भागांची काळजी घेणं होय. या काही साध्या टिप्स पाळल्या तर तुमचा उन्हाळ्यातील प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 6:08 PM IST









