advertisement

Panvel : फेमस अभिनेत्रीवर पनवेलमध्ये हल्ला? अभिनेता भाऊदेखील जखमी... 48 तासानंतरही सस्पेन्स!

Last Updated:

टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि तिच्या अभिनेता भावावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

फेमस अभिनेत्रीवर पनवेलमध्ये हल्ला? अभिनेता भाऊदेखील जखमी... 48 तासानंतरही सस्पेन्स!
फेमस अभिनेत्रीवर पनवेलमध्ये हल्ला? अभिनेता भाऊदेखील जखमी... 48 तासानंतरही सस्पेन्स!
पनवेल : टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री जन्नत झुबैर हिच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त समोर येत आहे. जन्नत सध्या कलर्स चॅनलवरील रियालिटी शो लाफ्टर शेफ 3 मध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर जन्नतची बरीच फॅन फॉलोइंग आहे. जन्नत आणि तिचा भाऊ अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाला आहे, ज्यात दोघांनाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
जन्नत आणि अयान काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये गेले होते, जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. जन्नत आणि अयान यांच्यावरच्या हल्ल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोघांनाही दुखापत झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. आतापर्यंत जन्नत झुबैर, अयान झुबैर किंवा त्यांचा परिवार तसंच पनवेल पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तांमुळे हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
advertisement
14 मार्चपासून सोशल मीडियावर जन्नत आणि अयान झुबैर यांच्यावर पनवेलमध्ये हल्ला झाल्याची वृत्त पसरत आहेत, पण या दोघांवर हल्ला झाला का नाही? याची पुष्टी न्यूज18 मराठी करत नाही.



 










View this post on Instagram























 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)



advertisement

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून सुरूवात

जन्नत आणि आयान हे दोघं त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. जन्नतने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अनेक सिरियल्समध्ये काम केलं आहे, याशिवाय ती चित्रपटांमध्येही दिसली आहे. दुसरीकडे आयानने जोधा अकबर या सीरियलमध्ये अभिनय केला होता.

भावा-बहिणीची जोडी

आयान आणि जन्नत या भावा-बहिणींना सोशल मीडियावर चाहत्यांकडून बरंच प्रेम मिळतं. तसंच हे दोघं अनेकदा एकत्रच दिसतात आणि सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असतात. हल्ला खरंच झाला का नाही? याबाबत आयान आणि जन्नत यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता या दोघांकडून काही प्रतिक्रिया आली तरचं या वृत्ताची सत्यता समोर येईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel : फेमस अभिनेत्रीवर पनवेलमध्ये हल्ला? अभिनेता भाऊदेखील जखमी... 48 तासानंतरही सस्पेन्स!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement