advertisement

Kitchen Tips : लिंबाची साल आणि बियांचे 'हे' जबरदस्त उपयोग तुम्हाला माहितीये? वाचून हैराण व्हाल!

Last Updated:
Lemon peel and seeds benefits : लिंबू उन्हाळयात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. लिंबाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे सरबताची त्याचा रस वापरणं. लिंबू सरबत उन्हाळयात खूप प्यायलं जात. पण तुम्हाला माहितीये लिंबाच्या रसाव्यतिरिक्त लिंबाची साल आणि बियाही खूप फायदेशीर आहे.
1/5
तुम्ही लिंबाचा रस वापरल्यानंतर त्याच्या साली फेकून देत असाल तर हे लेख नक्की वाचा. लिंबाच्या सालीचा वापर तुम्ही घरातील स्वच्छतेमध्ये करू शकता. लिंबाच्या सालींमध्ये नैसर्गिक सायट्रिक अ‍ॅसिड असतात, जे घाण आणि ग्रीस काढण्यास मदत करतात.

2/5
लिंबाच्या साली उकळवून त्या पाण्याचा वापर स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्म, गॅस स्टोव्ह किंवा सिंक स्वच्छ करता येतो. याने स्वच्छतेसोबत छान सुगंधही येतो. लिंबाच्या सालीची पावडरही भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरता येते. थोडक्यात लिंबाची साल नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते.

3/5
केवळ घराच्या स्वच्छतेसाठीच नाही तर लिंबाच्या सालींचा वापर स्किन केअरमध्येही केला जाऊ शकतो. लिंबाच्या वाळलेल्या सालींची पावडर नियमित फेस पॅकमध्ये टाकली जाते. यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढण्यास आणि त्वचा उजळवण्यास मदत होते.

4/5
काही लोक वाळलेल्या सालीच्या पावडरऐवजी ताज्या लिंबाच्या साली थेट चेहऱ्यावर वापरतात. लिंबाची साल घासल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि फ्रेश दिसते. या सालींमधील नैसर्गिक तेल त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.

5/5
लिंबाच्या सालींप्रमाणे लिंबाच्या बिया देखील फायदेशीर आहेत. लिंबाच्या बिया वाळवून जमिनीत पेरल्यास तुम्ही लिंबाचे झाड लावू शकता. काही लोक नैसर्गिक कीटकनाशक बनवण्यासाठीही बियांचा वापर करतात. या बियांमधील काही संयुगे कीटकांना दूर ठेवतात. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement