इगतपुरीत युवतीवर घरात घुसून अत्याचार, धर्म बदलण्यासाठी दबाव, नाशिकला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने स्वत:ची ओळख लपवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
इगतपुरी: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने स्वत:ची ओळख लपवून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकला होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी पीडितेला त्रास देत होता. हा प्रकार सहन न झाल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी इगतपूरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ओळख लपवून वाढवली मैत्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक सलीम शेख (वय २४, रा. पेठ रोड, रामनगर, नाशिक) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मुस्ताक याने स्वतःचा धर्म लपवून आणि खोटे सांगून पीडितेशी ओळख वाढवली होती. यातूनच त्याने २३ मार्च २०२२ रोजी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव
पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, आरोपी मुस्ताक याने तिला लग्नासाठी आणि स्वतःचा धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार धमकावले. आरोपीने तिला इगतपुरी येथील मंदिरात दोन वेळा बळजबरीने बोलावून घेतलं होतं. इतकेच नाही तर, जर तिने येण्यास नकार दिला, असता त्याच्या मामाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकीही त्याने दिली होती. याशिवाय, घरात घुसून दोन वेळा अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही पीडितेनं केला आहे.
advertisement
पोलीस कारवाई आणि कोठडी
या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नाशिकच्या शालिमार परिसरातून आरोपी मुस्ताकला ताब्यात घेतलं. सोमवारी त्याला नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 9:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
इगतपुरीत युवतीवर घरात घुसून अत्याचार, धर्म बदलण्यासाठी दबाव, नाशिकला हादरवणारी घटना!








