advertisement

Heart Failure : वारंवार पायांवर येणारी सूज 'हार्ट फेल्युअर'चं लक्षण तर नाही? तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती..

Last Updated:
Heart Failure Symptoms : हृदय निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळं शरीरासोबतच हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. हृदयात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. पायांवर वारंवार येणारी सूज हे 'हार्ट फेल्युअर'चं एक महत्त्वाचं लक्षणं आहे. अनेकदा लोक याकडे दूर्लक्ष करतात. तुमच्या पायांवर देखील सूज येत असेल तर तो 'हार्ट फेल्युअर'चा संकेत असू शकतो.
1/9
हृदयाचे स्नायू शरीराला आवश्यक असलेला रक्तपुरवठा योग्य पद्धतीनं पंप करण्यात अपयशी ठरतात तेव्हा हार्ट फेल्युअर होते. या स्थितीत हृदयाची पंपिंग प्रक्रिया मंदावण्यासोबतच रक्तप्रवाह संथ होतो आणि शरीरातील रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो. यामुळं शिरांमधील द्रव पदार्थ बाहेर पडून आसपासच्या उतींमध्ये साचू लागतात. परिणामी शरीराच्या विविध भागांवर सूज दिसू लागते.

2/9
ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या मते, घोटे किंवा पाय वारंवार सुजणं हे हार्ट फेल्युअरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेत या स्थितीला 'एडीमा' असे म्हटले जाते. या स्थितीत शरीरातील उतींमध्ये द्रव पदार्थ साठतो आणि त्या ठिकाणी सूज येते. ही सूज पायांच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात दिसते, कारण गुरुत्वाकर्षणामुळे द्रव पदार्थ शरीराच्या खालच्या भागात लवकर जमा होतात.

3/9
अनेक रुग्णांमध्ये पायांवरील सूज सकाळी उठल्यावर कमी असते. मात्र दिवस जसजसा पुढे सरकतो तशी ती वाढत जाते. याचं मुख्य कारण म्हणजे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करण्यात अपयशी ठरतं तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये दाब निर्माण होतो. हा दाब वाढल्यामुळं पेशींमधील पाणी किंवा द्रव बाहेर पडतं आणि पायांच्या घोट्याजवळ जमा होऊ लागतं.

4/9
'मायो क्लिनिक' या आरोग्य संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, एडीमाची काही ठराविक लक्षणं असतात. यात पाय, घोटे किंवा टाचांना सूज येणे, तिथली त्वचा ताणली गेल्यासारखी किंवा चमकदार दिसणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुजलेल्या भागावर बोटाने दाबल्यास तिथे खड्डा पडणे. याशिवाय सुजलेल्या भागात वेदनाही जाणवू शकते.

5/9
प्रत्येक वेळी पायांवर येणारी सूज ही हार्ट फेल्युअरमुळेच असते असे नाही. जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्यास किंवा बसून राहिल्याने देखील असे होऊ शकते. तसेच आहारात मिठाचे अतिप्रमाण, लठ्ठपणा, गर्भधारणा, काही औषधांचे दुष्परिणाम, दुखापत, मूत्रपिंड किंवा यकृताचे आजार आणि इन्फेक्शन यामुळेही पायांना सूज येऊ शकते.

6/9
तज्ज्ञांच्या मते, पायांच्या सुज येण्यासोबतच इतर काही लक्षणं अधिक चिंताजनक असू शकतात. यात थोडं चालल्यावर किंवा शारीरिक हालचाल केल्यावर धाप लागणं, सतत थकवा जाणवणं, हृदयाचे ठोके अनियमित किंवा वेगाने पडणं आणि व्यायामाची क्षमता कमी होणं या लक्षणांचा समावेश आहे. अनेकदा फुफ्फुसात द्रव साचल्यामुळं सतत खोकला किंवा श्वास घेताना घरघर असा आवाजही येऊ शकतो.

7/9
हार्ट फेल्युअरचा परिणाम केवळ हृदयावरच नाही, तर इतर अवयवांवरही होतो. यामुळे भूक कमी लागणे, मळमळणे, पोटात सूज येणे किंवा अचानक वजन वाढणे (शरीरात पाणी साचल्यामुळे) असे बदल घडू शकतात. काही रुग्णांना लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, तर काहींना छातीत वेदना जाणवू शकतात, जे हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत असू शकतात.

8/9
हार्ट फेल्युअरचा धोका काही विशिष्ट गटांमध्ये जास्त असतो. यामध्ये 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, धूम्रपान किंवा मद्यपान करणारे लोक आणि ज्यांची शारीरिक हालचाल कमी आहे अशा व्यक्तींचा यात समावेश आहे. याशिवाय आहारात मीठ आणि फॅटचे प्रमाण जास्त असलेल्यांनाही हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

9/9
ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचा त्रास आहे, त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबात आधी कोणाला हार्ट फेल्युअरचा त्रास झाला असेल, तर आनुवंशिकतेमुळं हा धोका अधिक वाढतो. अशा लोकांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement